अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'स्त्री २'(Stree 2)च्या बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आहे आणि हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील आहे. श्रद्धा कपूरच्या या चित्रपटाने 'गदर २' आणि 'जवान'चे रेकॉर्ड तोडले आहेत. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती लेखक राहुल मोदीं(Rahul Modi)सोबत डेटिंग आणि ब्रेकअपच्या अफवांमुळे देखील चर्चेत होती. आता अभिनेत्रीने ती रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी केली आहे.
कॉस्मोपॉलिटनशी बोलताना अभिनेत्री श्रद्धाने ती रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने कोणाचेही नाव घेतले नाही परंतु ती म्हणाली, "मला माझ्या जोडीदारासोबत वेळ घालवायला आणि त्याच्यासोबत चित्रपट पाहायला, जेवायला जाणे किंवा प्रवास करणे खूप आवडते. मी अशी व्यक्ती आहे जिला एकत्र काम करायला आवडते. उदाहरणार्थ, माझ्या शाळेतील मित्रांना नाही भेटले तर याचा माझ्या मूडवर परिणाम होतो. काल मी कुटुंबासोबत दुपारचे जेवण केले, जे माझ्यासाठी खूप उत्तेजक होते आणि हेच माझ्या नात्यांच्याबाबतीतही लागू होते."
लग्नाबद्दल श्रद्धा म्हणाली... लग्नाच्या प्रश्नावर श्रद्धा म्हणाली, "लग्नावर विश्वास ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा प्रश्न नाही, तर योग्य व्यक्ती असण्याचा आणि योग्य व्यक्ती असल्यामुळे त्याच्यासोबत राहण्याचा प्रश्न आहे. आणि जर कोणाला वाटत असेल की त्यांना लग्न करायचं आहे. मग ते खूप छान आहे. मात्र जर त्यांना वाटत असेल की त्यांना लग्न करायचं नाही तर तेही चांगलंच आहे.''
राहुल मोदींसोबत डेटिंगच्या चर्चाकाही दिवसांपासून श्रद्धा आणि राहुल डेट करत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. अभिनेत्रीला अनेकदा राहुल मोदींसोबत सिनेमा आणि डिनर डेटवर स्पॉट केले गेले. राहुल 'तू झुठी में मक्कर'चा लेखक आहे आणि चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोघे जवळ आले होते, तथापि, 'स्त्री २' रिलीज होण्यापूर्वीच, अफवा पसरल्या होत्या की श्रद्धा आणि राहुलचे ब्रेकअप झाले आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले.