Join us

'दिल रखले और..'; रोमँटिक पोस्ट लिहित श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबतच्या नात्याला केलं Confirm?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 9:44 AM

श्रद्धा कपूरने एक खास फोटो पोस्ट करुन तिच्या रिलेशनशीपचा जाहीर खुलासा केल्याची चर्चा आहे (shraddha kapoor)

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री. श्रद्धा अनेकदा पापाराझींसोबत हसतखेळत मजा करताना दिसते. याशिवाय कुटुंबाची मराठी पार्श्वभूमी असल्याने ती काहीवेळेस मीडियाशी मराठीत संवाद साधून सर्वांचं मनं जिंकते. श्रद्धा कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून राहुल मोदीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. पण श्रद्धाने या चर्चांना पुष्टी दिली नाही. पण काहीच तासांपुर्वी श्रद्धाने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे. यात तिचं कॅप्शन पाहता श्रद्धाने राहुलसोबतच्या नात्याचा जाहीर खुलासा केलाय असं दिसतंय. 

श्रद्धाचा फोटो आणि कॅप्शन काय?

श्रद्धाने काही तासांपुर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत पाहायला मिळतं श्रद्धा आणि राहुल मोदी यांनी खास पोज देत सेल्फी काढलाय. हा फोटो एवढा लक्षात येण्यासारखा नव्हता. पण फोटोखाली असलेल्या कॅप्शनमुळे चर्चांना उधाण आलंय. श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "दिल रख ले...नींद तो वापस दे दे यार।" आणि पुढे तिने हार्ट आणि हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. कॅप्शन आणि फोटोंवरुन श्रद्धाने राहुलसोबतच्या नात्याला confirm केल्याच्या चर्चा आहेत.

राहुल आणि श्रद्धाचं अफेअर

मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रद्धाची राहुलसोबत 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटादरम्यान भेट झाली होती. राहुल या चित्रपटाचा लेखक होता. एकत्र काम करताना दोघांची एकमेकांशी ओळख वाढली आणि ते प्रेमात पडले. राहुलने 'प्यार का पंचनामा 2', 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांसाठीही लेखनाची धुरा सांभाळली आहे. डिनर डेटनंतर हे जोडपे 2023 मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसले होते. तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा होत्या. अखेर नुकतंच श्रद्धाने अपलोड केलेल्या पोस्ट अन् कॅप्शनमुळे या चर्चा खऱ्या असल्याचं उघडकीस आलंय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

टॅग्स :श्रद्धा कपूरदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टबॉलिवूड