Join us

श्रद्धाच्या प्रेमाची अधुरी एक कहानी...! बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यावर करायची एकतर्फी प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 6:02 PM

श्रद्धा फरहान अख्तरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता तिने तिच्या एकतर्फी प्रेमाबद्दलचा खुलासा केला आहे.

बॉलिवूडची आशिकी गर्ल म्हणजेच श्रद्धा कपूरने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. श्रद्धा फरहान अख्तरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतर काही कारणास्तव ते वेगळे झाल्याचं बोललं जातं. आता नुकतंच श्रद्धानं एकतर्फी प्रेमाबद्दलचा खुलासा केला आहे.

तिचं बॉलिवूडच्या एका अभिनेत्यावर क्रश होतं. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ आहे. श्रद्धाने एका इव्हेंटमध्ये टायगर श्रॉफबद्दल बोलताना सांगितलं की, टायगर माझा खूप चांगला फ्रेंड आहे आणि हे खरं आहे की एका टाईमला तो माझा क्रश होता.

सर्वांना चांगलंच माहित की टायगर श्रॉफ कोणत्या अभिनेत्रीला डेट करतो आहे. दिशा पटानीनं आधीच टायगर श्रॉफला आधीच जिंकलं आहे. तरीदेखील श्रद्धानं बिनधास्त मनमोकळेपणाने आपल्या एकतर्फी प्रेेमाबद्दल सांगितलं की एकवेळ होता जेव्हा तिचं टायगर श्रॉफवर खूप प्रेम होतं. 

श्रद्धा कपूरने तिच्या करियरची सुरूवात बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा चित्रपट चीनी कममधून केलं होतं. याबद्दल ती म्हणाली की, पहिल्याच सिनेमात इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम करायला मिळणं खूप मोठी बाब आहे. मी जेव्हा त्यांच्यासोबत शूट करताना खूप घाबरत होती. मात्र मला आनंद आहे की मी मिस्टर बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर श्रद्धा कपूर लवकरच टायगर श्रॉफसोबत बागी ३ चित्रपटात झळकणार आहे. या दोघांनी यापूर्वी बागी चित्रपटात एकत्र काम केलेलं आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

या दोघांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

टॅग्स :श्रद्धा कपूरटायगर श्रॉफ