बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा सुपरहिट ठरलेला चित्रपट 'स्त्री'चा डंका आता जपानमध्ये वाजणार आहे. चित्रपट ‘साहो’नंतर भारतीय सीमा ओलांडून वैश्विक चित्रपटाच्या यादींमध्ये समाविष्ट होणारा हा श्रद्धाचा दुसरा चित्रपट आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाने आपल्या भारतातील प्रदर्शनाची दोन यशस्वी वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत. आणि आता देशाच्या सीमा ओलांडून हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा कपूरने ही अतिशय आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयावर शेअर करताना लिहिले आहे, की 'स्त्री' सर्व जिंकण्यासाठी सज्ज आहे. जपानमध्ये झाला प्रदर्शित. सावधान राहा.
या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर याची कथा कर्नाटकातील ९० च्या दशकात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. कर्नाटकच्या एका गावात रात्री एका स्त्रीचे भूत फिरायचे. हे भूत रात्री लोकांच्या घराचा दरवाजा ठोठवायची आणि जो कुणी दरवाजा उघडायचा, त्याचा मृत्यू व्हायचा. यानंतर या भूतापासून वाचण्यासाठी लोकांनी आपल्या घराच्या भिंतींवर 'कल आना' असे लिहिणे सुरू केले.