Join us

श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत करणार लग्न? अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 5:03 PM

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर पटकथा लेखक राहुल मोदीला डेट करत आहे. इव्हेंटमध्ये श्रद्धा कपूरला विचारण्यात आले की ती कधी लग्न करणार आहे. या प्रश्नावर श्रद्धा कपूरने इंटरेस्टिंग अंदाजात उत्तर दिले.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिचा आगामी चित्रपट 'स्त्री २' (Stri 2 Movie)चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलर लाँचच्या इव्हेंटमध्ये श्रद्धा कपूर आली होती. यावेळी तिला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. श्रद्धा कपूर पटकथा लेखक राहुल मोदी(Rahul Modi)ला डेट करत आहे. इव्हेंटमध्ये श्रद्धा कपूरला विचारण्यात आले की ती कधी लग्न करणार आहे. या प्रश्नावर श्रद्धा कपूरने इंटरेस्टिंग अंदाजात उत्तर दिले.

श्रद्धा कपूर स्त्री २च्या ट्रेलर लाँचवेळी लाल रंगाची साडी परिधान करून आली होती. यात ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिला रिलेशनशीप आणि लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना श्रद्धा कपूरने सांगितले की, ती स्त्री आहे आणि तिचे मन असेल तेव्हा ती लग्न करेल.

श्रद्धा कपूर राहुल मोदीला करतेय डेटश्रद्धा कपूरने जूनमध्ये इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत राहुल मोदीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे कन्फर्म केले होते. राहुल मोदी बॉलिवूडचा प्रसिद्ध लेखक आहे. राहुलने प्यार का पंचनामा बनवणाऱ्या लव रंजनसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. राहुल श्रद्धापेक्षा तीन वर्ष लहान आहे.

या दिवशी रिलीज होणार 'स्त्री २'श्रद्धा कपूरचा स्त्री २ १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा चित्रपट २०१८ साली रिलीज झालेल्या स्त्रीचा सीक्वल आहे. स्त्री २मध्ये पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, तमन्ना भाटिया आणि अभिषेक बॅनर्जी दिसणार आहे. स्त्री चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचं तर  ३० कोटीच्या बजेटमध्ये बनला होता आणि या चित्रपटाने भारतात १२९.८३ कोटींचा बिझनेस केला होता. तर जगभरात १८२ कोटींची कमाई केली होती.

टॅग्स :श्रद्धा कपूर