श्रद्धा कपूरने घेतला फरहान अख्तरपासून दूर जाण्याचा निर्णय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 05:59 AM2018-01-03T05:59:12+5:302018-01-03T11:29:12+5:30

बॉलिवूडमध्ये रोज नव्या जोड्या बनतात आणि तुटतात हे आता काही नवं राहिले नाही. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर ...

Shraddha Kapoor took the decision to go away from Farhan Akhtar? | श्रद्धा कपूरने घेतला फरहान अख्तरपासून दूर जाण्याचा निर्णय ?

श्रद्धा कपूरने घेतला फरहान अख्तरपासून दूर जाण्याचा निर्णय ?

googlenewsNext
लिवूडमध्ये रोज नव्या जोड्या बनतात आणि तुटतात हे आता काही नवं राहिले नाही. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सध्या श्रद्धाला फक्त करिअरवर फोकस करायचा आहे म्हणून ती काहीशी फरहान अख्तर पासून दूर गेल्याची कळतेय. रिपोर्टनुसार श्रद्धा कपूरने फरहान अख्तरला इन्स्टाग्रामवरुन देखील अनफॉलो केले आहे. हे कधी सगळं नेमकं कधी झाले ते कुणालाच माहिती नाही मात्र हे थोड्या दिवसांपूर्वीच झाले आहे ऐवढे मात्र नक्की. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ऐवढे सगळं असताना देखील फरहान अख्तर अजूनही श्रद्धाला सोशल मीडियावर फॉलो करतो आहे.  

फरहान आणि श्रद्धा लव्ह स्टोरी त्यावेळी प्रकाश झोतात आली होती जेव्हा शक्ति कपूरने रातोरात श्रद्धाला फरहानच्या घरातून खेचून नेले होते. मात्र याप्रसंगानंतरही दोघे एकमेकांना भेटत राहिले. फरहानची आई अभिनेत्री हनी इराणी यांना हे नाते पसंत नसल्याची चर्चा आहे. फरहानने श्रद्धासाठी त्याची पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतल्याची ही चर्चा आहे. अधुना आणि फरहान यांना दोन मुली आहेत. फरहानने अधुनाला घटस्फोट देणे हे हनी यांना पटले नव्हते. 

श्रद्धा ज्यावेळी फरहानला भेटायला जायची तेव्हा ती ड्रायव्हरला गाडी जुहूमधल्या एका गार्डनच्या बाहेर लावायला सांगायची. ऐवढेच काय तर दोघांनी कोल्ड प्ले ही एकत्र अडेंट केले होते. दोघांच्या कुटुंबीयांना त्यांचे हे नातं अजिबात मंजूर नाही आहे. शक्ती कपूरने अनेक वेळा फरहानला श्रद्धा पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रॉक ऑन-2 च्या सेटवर फरहान आणि श्रद्धामधील नाते फुलले. या दोघांमधील जवळीक बघूनच अधुनाने फरहानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. श्रद्धा आणि फरहानने या गोष्ट केवळे अफवा असल्याचे सांगितले. 
सध्या श्रद्धा साहोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात ती प्रभाससोबत दिसणार आहे. ‘साहो’नंतर ती बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावरील बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

Web Title: Shraddha Kapoor took the decision to go away from Farhan Akhtar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.