श्रद्धा म्हणतेय, मी या अभिनेत्रींची फॅन आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2016 1:21 PM
अभिनेत्री म्हटल्या की त्यांच्यात भांडणे ही असणारच असेच सगळ्यांना वाटत असते. पण सध्याच्या अभिनेत्री या वादविवाद न करता हेल्दी ...
अभिनेत्री म्हटल्या की त्यांच्यात भांडणे ही असणारच असेच सगळ्यांना वाटत असते. पण सध्याच्या अभिनेत्री या वादविवाद न करता हेल्दी कॉम्पिटेशन करण्यास पसंती देतात. त्यामुळे मीडियासमोर एकमेकींचे कौतुक करण्यातही त्या मागे पडत नाहीत. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या रॉक ऑन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ती तिच्या चित्रपटासोबतच इतर अभिनेत्रींच्या कामाचेही कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेने प्रेमरोग या चित्रपटात साकारलेली भूमिका तिला खूप आवडते. या भूमिकेसारखी एखादी भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल असे ती सांगते. पद्ममिनी तिची मावशीच असल्याने श्रद्धाने तिचे कौतुक करण्यात काही नवल नाहीये. पण श्रद्धा तिच्यासोबतच आणखी काही अभिनेत्रींचे कौतुकही करत आहे. आजच्या घडीला केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राची ती खूप मोठी फॅन असल्याचे सांगते. प्रियांकासोबतच ती कंगना राणौतच्या अभिनयाच्यादेखील प्रेमात आहे. श्रद्धा सांगते, "मला प्रियांका चोप्रा आणि कंगना राणौत या दोघींचा अभिनय खूप आवडतो. त्यामुळे तुला भविष्यात कोणती भूमिका साकारायला आवडेल असे मला कोणी विचारले तर मला प्रियांका चोप्राने मेरी कोममध्ये साकारलेली अथवा कंगनाने क्विन या चित्रपटात साकारलेली भूमिका साकारायला आवडेल असेच मी सांगते. या दोघींनीही या चित्रपटांमध्ये अफलातून अभिनय केला आहे."श्रद्धाने रॉक ऑन या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे यंदा भाऊबीजदेखील साजरी केली नाही. पण माझा भाऊ मला समजून घेत असल्याने मला प्रमोशनाला वेळ देता आला असे ती सांगते.