Join us  

Shraddha Walker Murder Case: देशाला हादरुन टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडावर बनणार चित्रपट, सिनेमाचं नावही आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:56 PM

श्रद्धा वालकर प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी उलगडत आहेत

Shraddha Walker Murder Case, Bollywood: महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब आमीन पुनावाला याने तिची आधी हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना उघडकीस आली. श्रद्धा वालकर ही तरूणी आफताब बरोबर दिल्लीमध्ये वास्तव्यास होती. त्यावेळी आफताबने तिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणानंतर आफताबबद्दल साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पण तशातच बॉलिवूडने या हत्याकांड प्रकरणावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. एका वृत्तानुसार, चित्रपट दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनीही या प्रकरणावर चित्रपट बनवण्याच्या सुरूवातीच्या टप्प्याचे कामही सुरू केले आहे.

'या' नावाने चित्रपट बनवला जाणार आहे

इंडिया हेराल्डच्या वृत्तानुसार, निर्माता-दिग्दर्शक मनीष एफ सिंग दिल्ली हत्याकांडावर चित्रपट बनवणार आहेत. चित्रपटाचे कामाचे नाव - 'Who Killed Shraddha Walker' ठेवण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, हा चित्रपट श्रद्धा वालकरच्या हत्येवर आधारित असेल. या चित्रपटाच्या पटकथेवरही काम सुरू झाले आहे. मात्र, जोपर्यंत पोलीस आरोपपत्र दाखल करत नाहीत, तोपर्यंत पटकथा निश्चित होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लव्ह जिहाद हा चित्रपटाचा मुद्दा असेल!

मनीष एफ सिंग यांनी त्यांच्या चित्रपटाबाबत स्पष्ट केले आहे की हा चित्रपट लव्ह जिहादवर असेल. मुलींची फसवणूक करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांचे कारस्थान जगासमो उघड करणारा असा हा चित्रपट असेल. तसेच, हा चित्रपट श्राद्ध वालकर प्रकरणावर नव्हे तर त्या प्रकरणावर प्रेरित असेल. वृंदावन फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट बनणार असून, त्यात कोणते कलाकार असतील, हे अद्याप ठरलेले नाही. श्रद्धा वालकर मर्डर केस बाबत बोलतानाही अनेक लोक लव्ह जिहाद चा उल्लेख करत आहेत. पण जोवर पोलीस या प्रकरणातील सर्व प्रकारचा तपास पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत अशा कोणत्याही प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे बोलले जात आहे. पोलीस प्रामाणिकपणे काम करत असून या प्रकरणाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :श्रद्धा वालकरबॉलिवूडगुन्हेगारीदिल्ली