Join us

'ये लवकर पुढच्या वर्षी आनंदाने..' लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाली श्रेया बुगडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 4:11 PM

लाडक्या बाप्पांना निरोप देताना मात्र श्रेया बुगडे भावूक झाली.

अख्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या घरी गणपती बसवतात. यावर्षीही अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं थाटात स्वागत केलं. चला हवा येऊ द्या फेम लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेनेही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती. पण, बाप्पांना  निरोप देताना मात्र श्रेया बुगडे भावूक झाली.

श्रेया बुगडेने बाप्पाला निरोप देतानाची भावुक पोस्ट शेअर केलीय. तिने लिहलं की, "काल ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ असे म्हणत तुझा निरोप घेतला. आणि नेहेमी सारखे अश्रू अनावर झाले. गेल्या इतक्या वर्षात ह्या ५ दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं मला आठवत नाही. पण एक सांगेन ह्या ५ दिवसात तुझ्यायेण्याने जेवढा आनंद मला मिळतो. तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही.

 श्रेयाने पुढे लिहलं की "तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात. तुझं कौतुक करतात. तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. ही प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव. तुझी सेवा करायची संधी आम्हाला देत राहा! विसर्जन फक्त म्हणायला रे , बाकी माझ्यासोबत तू असतोसच कि ...कायम दिसत राहतोस ..कधी कामात ,कधी माणसांमध्ये माझ्यावर अतोनात निःस्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे".

पुढे तिने लिहलं, "Mumma म्हणते तसं "जाते नाही येते म्हणावं गं " मग आता ..ये लौकर पुढच्या वर्षी आनंदाने... तुला सगळ्यासाठी खूप THANK YOU! आणि एक घट्ट मिठी. सुखी राहा ! आनंदात राहा ..तुला खूप prem.. भेटूच".

श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रेया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती काही नवनवीन पोस्ट शेअर करत असते. श्रेया बुगडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर केला होता.

टॅग्स :श्रेया बुगडेमराठी अभिनेताचला हवा येऊ द्या