Join us  

कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर श्रेया घोषालने उचलले महत्त्वाचे पाऊल, चाहत्यांकडून 'मेलोडी क्वीन' कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 7:11 PM

बंगालमध्ये तर भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

Shreya ghoshal on kolkata rape case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून देशात संतापाची लाट आहे. बंगालमध्ये तर भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवरून राजकीय वातावरणही तापलं आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशातच आता  'मेलोडी क्वीन' श्रेया घोषाल महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

श्रेया घोषालने कोलकातामधील आयोजित कॉन्सर्ट हा रद्द केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहिले, " कोलकातामध्ये भयंकर घटना घडली. एक महिला म्हणून तेथील डॉक्टरबरोबर जे चुकीचं कृत्य घडलं त्याबबद्दल विचार करणेदेखील कठीण आहे. मी थरथर कापतेय. मी कोलकातामधील आयोजित कॉन्सर्ट रद्द करतेय. या कॉन्सर्टची आम्हा सर्वांना खूप अपेक्षा होती. पण एक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे".

पुढे तिनं लिहलं, "केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर या जगातील महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी मी मनापासून प्रार्थना करते. मला आशा आहे की माझे मित्र आणि चाहते माझा हा निर्णय समजून घेतील. अशा राक्षसांविरुद्ध आपण एकजूट होऊन उभे राहणे गरजेचे आहे.  तसेच जर या शोची कोणीही तिकीटं घेतली असतील तर ती तिकीटं नवीन शोसाठीदेखील चालू शकतील". श्रेया घोषालच्या या निर्णयाचं चाहते कौतुक करत आहेत. 

टॅग्स :श्रेया घोषालसेलिब्रिटीबॉलिवूडपश्चिम बंगाल