Join us

श्रेयस तळपदेच्या आईने आयुष्यात पहिल्यांदाच दिली सेटला भेट, आनंदात शेअर केला आईसोबतचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 1:58 PM

श्रेयस गेली अनेक वर्षं चित्रपट, मालिकांमध्ये काम करत असला तरी त्याची आई त्याच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी गेली नव्हती. पण आता श्रेयसच्या आईने त्याच्या चित्रपटाच्या सेटवर आयुष्यात पहिल्यांदाच भेट दिली आहे.

ठळक मुद्देश्रेयसने त्याच्या आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, पुष्करमधील सावित्रीदेवीच्या मंदिरात माझी खऱ्या आयुष्यातील आई आणि चित्रपटातील आई.... माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा माझ्या आईने माझ्या चित्रपटाच्या सेटला भेट दिली.

श्रेयस तळपदेने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. त्याने त्याच्या करियरची सुरुवात मराठीतून केली. त्याने त्याच्या करियरच्या सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये काम केले होते. मराठीत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तो हिंदीकडे वळला. इक्बाल या चित्रपटाने त्याच्या करियरला दिशा मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

श्रेयस गेली अनेक वर्षं चित्रपट, मालिकांमध्ये काम करत असला तरी त्याची आई त्याच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी गेली नव्हती. पण आता श्रेयसच्या आईने त्याच्या चित्रपटाच्या सेटवर आयुष्यात पहिल्यांदाच भेट दिली आहे. याचा श्रेयसला प्रचंड आनंद झाला असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. श्रेयसने त्याच्या आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, पुष्करमधील सावित्रीदेवीच्या मंदिरात माझी खऱ्या आयुष्यातील आई आणि चित्रपटातील आई.... माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा माझ्या आईने माझ्या चित्रपटाच्या सेटला भेट दिली. याशिवाय दुसरा कोणता आनंद असूच शकत नाही.

मराठी इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. तो सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो नेहमीच त्याच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना दिसतो. मराठीनंतर बॉलिवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयसने मराठी मालिकांमधून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. मराठी मालिका 'दामिनी' मधील त्याची भूमिका त्यावेळी प्रचंड गाजली आणि त्यानंतर त्याला यश मिळत गेलं. बॉलिवूडमध्ये इकबाल या सिनेमानं श्रेयसला स्वत:ची वेगळी ओळख मिळवून दिली. त्याच्या भूमिकेच खूप कौतुकही झालं. श्रेयस काही काळापूर्वी सेटर्स या सिनेमात दिसला होता.

टॅग्स :श्रेयस तळपदे