Join us

Madhuri Dixit Birthday : माझी बायको..., माझी सोलमेट्स..., पती श्रीराम नेनेंनी माधुरीसाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 12:54 PM

Madhuri Dixit Birthday : श्रीराम नेने यांनी माधुरीसोबतचा एक गोड फाटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेलं कॅप्शन अतिशय सुंदर आहे.

Madhuri Dixit Birthday :  आपल्या अदांनी सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. वयाची 55 वर्षे पूर्ण करूनही माधुरी आजही पूर्वीइतकीच टवटवीत दिसते. आजही चाहते तिच्यावर फिदा आहेत. चाहते माधुरीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. माधुरीचा नवरा श्रीराम नेने  (Shriram Nene) यांनीही बायकोसाठी खास पोस्ट लिहित तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. श्रीराम नेने यांनी माधुरीसोबतचा एक गोड फाटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेलं कॅप्शन अतिशय सुंदर आहे. ‘जगातील सर्वात सुंदर स्त्री, माझी पत्नी, माझी सोलमेट, माझी सर्वात चांगली मैत्रिण.., तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू जगातील सर्वोत्तम गोष्टी तुला मिळाव्यात. येणारी वर्ष अप्रतिम असो आणि आपली अशीच सोबत असो... हॅपी बर्थ डे सोलमेट्स...,’असं त्यांनी लिहिलं आहे.श्रीराम नेनेंच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही माधुरीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अशी झाली होती माधुरी-नेनेंची पहिली भेटमाधुरी आणि श्रीराम नेने यांची पहिली भेट अगदी योगायोगानं झाली होती; पण पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली. या दोघांची पहिली भेट लॉस एंजिल्स येथे माधुरीच्या भावाच्या पार्टीमध्ये झाली. माधुरी सुपरस्टार होती; पण डॉ. नेने यांना याची काहीच कल्पना नव्हती. माधुरी एक अभिनेत्री आहे आणि ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करते, हे देखील त्यांना माहीत नव्हतं. एकदा डॉ. नेने यांनी माधुरीला आपल्याबरोबर डोंगरावर बाइकवरून येण्यासंबंधी विचारलं आणि माधुरीनं त्याला होकार दिला. पण बाईकवरून डोंगरावर जाणं फार कठीण होतं. मात्र इथूनच माधुरी आणि श्रीराम नेने एकमेकांच्या अधिक जवळ आले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूड