मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. श्रिया पिळगावकर लवकरच हाथी मेरे साथी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राणा दुग्गाबती, पुलकित सम्राट आणि झोया हुसेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रिया सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरची लेक आहे. नुकतेच श्रियाने एका मुलाखतीत सांगितले की, स्टारकिड असल्याचा मी कधीच फायदा घेतला नाही.
श्रिया पिळगावकरने स्टार किड्सच्या मुद्द्यावर सांगितले की, खरेतर फार कमी लोकांना माहित होते की मी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरची मुलगी आहे. मात्र खूप लोकांना याबद्दल माहित नव्हते. मात्र जेव्हा त्यांना हे समजायचे तेव्हा ते जास्त खू व्हायचे. नेहमी लोक म्हणातात की स्टार किड्ससाठी खूप सोप्पे आहे आपले नाव बनवणे, पण माझ्या केसमध्ये असे नव्हते.
पुढे ती म्हणाली की, मला माहित होते की माझ्या आई वडिलांचा नेहमीच मला पाठिंबा असेल पण मी कधीच तो रस्ता निवडला नाही. मी माझ्या कौशल्यावर ऑडिशन दिल्या. कधी काम मिळाले तर कधी नाही. प्रवास कसाही असला तरी मला माझ्यावर आणि माझ्या आई वडिलांना माझ्यावर गर्व आहे. मला त्यांना माझा अभिमान वाटेल असे करायचे आहे.
‘हाथी मेरे साथी’मध्ये श्रिया अरुंधती हे एक तरुण पत्रकाराचे पात्र साकारत असून ती हत्ती व त्यांचा अधिवास वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे तर राणा बंडदेवची भूमिका साकारत आहे. ही एक कथा आहे जी अनेक घटनांनी प्रेरित आहे ज्याने आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग जंगलामध्ये घालविला आहे, अशा व्यक्तीची (राणा डग्गुबाती) ही कथा आहे, जी पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित आहे. हा २०२१ चा पहिला त्रीभाषी चित्रपट असून तेलगूमध्ये ‘अरण्य’ आणि तामिळमध्ये ‘कदान’ या नावाने प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू सोलोमन यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती इरोज मोशन पिक्चर्स, इरोज एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशनच्या विभागाने केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ही एक प्रस्थापित कंपनी आहे, ज्यांचा या क्षेत्रातील अनुभव ४० हुन अधिक वर्षांचा आहे. हाथी मेरे साथी चित्रपट २६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.