Join us

दारूच्या आहारी गेली होती या सुपरस्टारची मुलगी, घ्यावा लागला वर्षभराचा ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:19 AM

ब्रेकअपमुळे ती सैरभैर झाली होती. शिवाय तिचे दारूचे व्यसनही प्रचंड वाढले होते.

ठळक मुद्दे श्रुती व मायकेल या दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती.

 गेल्या दोन वर्षांपासून  श्रुती मायकेल कोर्सेलला डेट करत होती.  श्रुती मायकेल कोर्सेलसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचीही चर्चा होती. इतकेच नाही तर श्रुतीने वडील कमल कमल हासनसोबतही मायकेलची भेटदेखील घालून दिली होती. पण अचानक श्रुती व मायकेलचे ब्रेकअप झाले. यामुळे श्रुती सैरभैर झाली होती. शिवाय तिचे दारूचे व्यसनही प्रचंड वाढले होते. एका ताज्या मुलाखतीत श्रुती यावर बोलली.

‘मी व्हिस्कीच्या इतक्या आहारी गेले होते की त्याचा परिणाम माझ्या करिअरवरही होऊ लागला होता. हे व्यसन नंतर इतके वाढले की मला अभिनयातून ब्रेक घ्यावा लागला होता’, असे श्रुतीने ‘फीट अप विथ स्टार्स’ या चॅट शोमध्ये तिने सांगितले. अर्थात गतवर्षी श्रुती  या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडली.   

व्यसनमुक्त होण्याची प्रक्रिया कठीण होती. मी आजारी पडले होते. पण मी कुणालाही सांगितले नाही. माझ्या मते, हा माझ्या खासगी आयुष्याचा भाग होता. त्यामुळे मित्रांना व अन्य कुणालाही मी याबद्दल काहीही सांगितले नाही. या काळात मी वैद्यकीय उपचार घेतले आणि यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केलेत. आता मी यातून पूर्णपणे बाहेर पडले आहे. माझ्याकडे हेल्दी माइंड आणि हेल्दी शरीर आहे, असेही तिने सांगितले.

ब्रेकअपबद्दलही ती बोलली. ‘मला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. माझ्यासाठी तो संपूर्ण एक चांगला अनुभव होता. त्यातून मी खूप काही शिकले’, असे ती म्हणाली. श्रुती व मायकेल या दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती. श्रुती याठिकाणी एका ब्रिटीश रॉकबँडसोबत एका गाण्याच्या रेकॉर्र्डिंगसाठी गेली होती. पहिल्याच भेटीत श्रुती व मायकेल दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे दोघांचेही डेटिंग सुरु झाले. मायकेल हा एक ब्रिटीश आर्टिस्ट आहे. लंडनस्थित ‘डिप डायविंग’ या थिएटर ग्रूपशी तो जुळलेला आहे. 

टॅग्स :श्रुती हसनकमल हासन