अभिनेत्री श्रुती हासन तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. गेल्या दोन वर्षांपासून श्रुती मायकेल कोर्सेलला डेट करते आहे. मायकेल कोर्सेलसोबत श्रुतीचे रिलेशनशीप 2016मध्ये सुरु झालं. श्रुतीच्या वाढदिवसाला हे कपल जानेवारीमध्ये लॉस ऐंजिलिसमध्ये होते. श्रुतीसोबत मायकेल नेहमीच भारतात फिरताना दिसायचा. लवकरच श्रुती मायकेल कोर्सेलसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा होती. ऐवढंच नाही तर श्रुतीने वडील कमल कमल हासनसोबत मायकेलची भेटदेखील घालून दिली होती.
मायकेलने कमल हासनच्या 'विश्वरुपम 2' मध्ये भूमिकादेखील साकारली होती. गेल्या महिन्यापर्यंत यांच्यामध्ये सगळं काही ठिक चाललं होते. मात्र अचानक माशी कुठे शिंकली ते कळले नाही. श्रुती आणि मायकेलचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.