चित्रपटांचे चित्रीकरण करत असताना कोणत्या दृश्याची काय काय मागणी आहे हे अनेकवेळा कलाकारांना आधीच सांगितले जाते. पण काहीवेळा अचानक चित्रीकरण करताना एखादी गोष्ट कलाकारांच्या समोर येते. काही वेळा कलाकार त्या गोष्टीसाठी तयार होतात तर काही वेळा स्पष्ट नकार देतात असेच काहीसे एका अभिनेत्रीसोबत घडले होते. तिनेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली आहे.
भोजपुरी अभिनेत्री शुभी शर्माने नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. गाण्याचे चित्रीकरण झाल्यानंतर गाण्याच्या अखेरीस नायकासोबत लीप लॉक सीन द्यायला दिग्दर्शकाने मला सांगितले. मी त्यावर नकार दिला असता ही पटकथेची मागणी असल्याचे त्यांनी मला सांगितले. यावर मला पटकथा दाखवा असे मी त्यांना उत्तर दिले. मी पटकथा वाचायला घेतली, त्यावेळी या दृश्यात लीप लॉक सीनची कोणतीही गरज नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावर तुम्हाला चित्रीकरण करायचे तर करा... पण मी हा सीन देणार नाही आणि तुम्ही जबरदस्ती केल्यास मी निघून जाईन असे मी त्यांना सुनावले. माझा हा रुद्रावतार पाहून चित्रपटाचे निर्माते चांगलेच घाबरले आणि तिथून निघून गेले.
पुढे ही अभिनेत्री सांगते, मी चिडलेली पाहाताच लीप लॉक सीनशिवायच चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. माझ्या या रूपानंतर चित्रपटाचे चित्रीकरण संपेपर्यंत सगळेच जण माझ्याशी सांभाळूनच वागत होते.