Join us

मुंबईहून बिहारला शूटिंगसाठी गेलेल्या कलाकारांना झाली मारहाण, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 1:48 PM

मुंबईहून बिहारला शूटिंगसाठी गेलेल्या कलाकारांना झाली मारहाण

चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईतून बिहारला गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे तिथेच अडकेलल्या कलाकारांसोबत आणि क्रू मेंबरसोबत धक्कबुक्की झाल्याचे समजते आहे. हा सगळा प्रकार पाहून अभिनेत्री प्राची सिंग हिची तब्येत अचानक बिघडली. सोबतच्या इतर लोकांनी तिला हॉस्पिटलला नेले. डॉक्टरांनी तिला प्राथमिक उपचारानंतर तिला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. सदर कलाकार बिहारमधील शाळेत थांबले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इश्क दीवाना या सिनेमाची शूटिंग सुपौलच्या पिपरा ठाण्यातील रतौली गावात सुरू होती. यासाठी 65 लोकांची टीम रतौलीला आली होती. लॉकडाऊनमध्ये अडकल्यानंतर त्यांनी शाळेत आश्रय घेतला होता.

धक्काबुक्कीच्या घटनेबद्दल बोलताना क्रूमधील लोकांनी सांगितलं की, स्थानिक सुशील सिंग आणि सिंटू सिंग शाळेमध्ये येऊन युनिटमधील मुलींचा व्हिडीओ तयार करत होते. विरोध केल्यानंतर त्यांनी मारहाण केली. महिलांनाही धक्काबुक्की केली. दिग्दर्शक आणि अभिनेता मनोज आर पांडे मध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबतही गैरवर्तन केले. हे सगळे पाहून प्राची सिंग बेशुद्ध झाली होती. युनिटने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दरम्यान हे प्रकरण आता पोलिसात गेले आहे. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :बिहारगोळीबार