श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan) ही बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली, तरी सातत्याने चर्चेत असते. ऐश्वर्या राय बच्चन व श्वेता बच्चन या दोघी नणंद-वहिनी फार कमी वेळा एकत्र दिसतात. त्यातही त्या एकमेकींशी संवाद साधताना फारशा दिसत नाहीत, त्यामुळे त्या दोघींचं एकमेकींशी पटत नसल्याच्या चर्चाही खूपदा होत असतात. तुम्हाला माहितेय आपल्या वहिणीचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान (Aishwarya Rai ex boyfriend Salman Khan) श्वेताला खूप आवडायचा. तिनेच एकदा याचा खुलासा केला होता.
सलमान खान श्वेताचा क्रश होता. श्वेतानेच याबाबतचा खुलासा 'कॉफी विथ करण' या शोमध्ये केला होता. श्वेताने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सलमानवर क्रश असल्याचे सांगितले होते. श्वेता म्हणाली होती की, ती बऱ्याचवेळा वडील अमिताभ बच्चन आणि आई जया बच्चन यांच्यासोबत सेटवर जात असे, त्यामुळे मी सलमानची फॅन झाले.
करणने त्याच्या शोमध्ये श्वेताला हॉटनेसनुसार कलाकारांना रँक लावण्यास सांगितले. यामध्ये श्वेताने सर्वात आधी सलमानचे नाव घेतले. तिला सलमानचे इतके वेड होते की, ती सलमानची 'मैंने प्यार किया' या सिनेमातील टोपी घालून झोपायची, असे श्वेताने सांगितले. विशेष म्हणजे सलमानची ही टोपी आपल्या बहिणीसाठी अभिषेक घेऊन आला होता.
दरम्यान, ऐश्वर्या ही एकेकाळी सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती; पण त्यांचे नाते काही पुढे सरकले नाही. पण हे नातं अत्यंत वाईट पद्धतीने संपलं. दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय होते? हे तर फार कमी जणांना ठाऊक आहे. त्यानंतर ऐश्वर्या व अभिषेक बच्चन भेटले, दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यावर २००७ मध्ये लग्न केलं. आराध्या नावाची एक गोड मुलगी ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आहे.