Join us  

श्वेता तिवारीची लेक करतेय सैफच्या मुलाला डेट?, पलक-इब्राहिम एकत्र झाले स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 12:14 PM

Palak Tiwari -Ibrahim Ali Khan : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सैफ अली खान-अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान पुन्हा एकदा त्यांच्या भेटीमुळे चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सैफ अली खान-अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान पुन्हा एकदा त्यांच्या भेटीमुळे चर्चेत आले आहेत. काल सोमवारी रात्री पलक तिवारी इब्राहिमच्या इमारतीतून बाहेर पडताना दिसली आणि त्यावेळी पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. पलक इब्राहिमच्या इमारतीबाहेर दिसली असली तरी दोघेही वेगवेगळ्या कारमधून निघताना दिसले.

दोन्ही स्टार किड्स एकमेकांसोबत बऱ्याचदा स्पॉट होतात. पलक आणि इब्राहिम एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा मीडियामध्ये आहे. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते स्वीकारलेले नाही. पलकने तिच्या मुलाखतींमध्ये अनेकदा हे सांगितले आहे की ते दोघे कपल नाहीत, ते फक्त चांगले मित्र आहेत. आता, काल रात्री पलकला इब्राहिमच्या घराबाहेर तिच्या कारमधून निघताना पाहून त्यांचे रिलेशनशीप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पलक तिच्या लाल कारमधून निघून जात असताना, इब्राहिम त्याच्या नवीन कारमध्ये जाताना दिसला.

लोकांनी विचारले- त्यांच्यात काय चालले आहे?सोशल मीडियावर पलकच्या या व्हिडिओवर लोकांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने प्रश्न विचारला की, दोघांमध्ये काय चालले आहे? काहींनी तर असंही म्हटलं आहे की, हे सगळं काही दिवसांची गोष्ट आहे, मग हे लोक ब्रेकअपबद्दल बोलतील.

पापाराझींकडे केलं दुर्लक्षमात्र, व्हिडिओमध्ये उपस्थित पापाराझी पाहून पलकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ती सतत फोनकडे पाहून कॅमेरा टाळण्याचा प्रयत्न करताना दिसली.

पलक म्हणाली होती- आम्ही...पलक म्हणाली होती की, ते कपल आहेत, या गोष्टी अजिबात खऱ्या नाहीत. ती असेही म्हणाली होती की आम्ही बहुतेक तेव्हाच बोलतो जेव्हा आम्ही एखाद्या सामाजिक संमेलनात भेटतो. पलकने याआधी म्हटले आहे की, आम्ही मित्र आहोत पण लोक विचार करतात तितके जवळ नाही. एकदा सिद्धार्थ कन्ननसोबतच्या मुलाखतीत पलक म्हणाली होती, 'इब्राहिम टॅलेंटेड आहे आणि त्याच्यात मोठा स्टार बनण्याची क्षमता आहे. 

वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पलक तिवारीने सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तर इब्राहिम पृथ्वीराज सुकुमारन आणि काजोलसोबत 'सरजमीन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :पलक तिवारीइब्राहिम अली खानसैफ अली खान श्वेता तिवारी