Join us  

Sid Kiara Wedding Reception : सिड- कियाराचं रिसेप्शन, एक्स गर्लफ्रेंड आलियाच्या एंट्रीने वेधलं लक्ष; अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:49 AM

सिड कियाराचे वेडिंग रिसेप्शन मुंबईच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडले.

बॉलिवूडमधील मोस्ट फेव्हरेट कपल सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी ७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. सिद्धार्थ दिल्लीचा असल्याने दोघांनी आधी दिल्लीत रिसेप्शन दिले. यानंतर काल मुंबईत बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन झाले. रिसेप्शनसाठी आलेल्या कलाकारांवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. यात लक्ष वेधून घेतलं ते आलिया भटच्या एंट्रीनं. नुकतीच आई झालेली आलिया गोल्डन रंगाच्या साडीत रिसेप्शनसाठी पोहोचली.

सेंट रेगिस येथे पार पडलेल्या रिसेप्शनसाठी सिद्धार्थ-कियाराचं अख्खं कुटुंब उपस्थित होतं. ब्लॅक अॅंड व्हाईट स्टायलिश ड्रेस मध्ये कियारा अतिशय सुंदर दिसत होती. तर गळ्यात भलामोठा नेकलेस असा तिचा लुक होता. तर सिद्धार्थ काळ्या रंगाच्या ग्लिटरिंग सूटमध्ये हॅडसम दिसत होता. यावेळी दोघांनी कॅमेऱ्यासमोर छान पोज दिल्या. सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.  सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी या रिसेप्शन सोहळ्याचे अनेक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

एक्स गर्लफ्रेंड आलियाने वेधलं लक्ष

सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट आणि वरुण धवन यांनी 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज तिघेही खऱ्या आयुष्यात पुढे गेले आहेत. खरं तर स्टुडंट ऑफ द इयर वेळी सिद्धार्थ-आलिया रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. यानंतर आलिया रणबीर कपूर सोबत रिलेशनमध्ये आली तर सिद्धार्थ आणि कियाराचे अफेअर सुरु झाले. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले. आज सिद्धार्थच्या रिसेप्शनसाठी हजेरी लावत आलियाने मैत्री राखली. गोल्डन रंगाच्या ग्लिटरिंग साडीत आलियाचे सौंदर्य खुलून आले. विशेष म्हणजे आलिया आणि कियारा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांच्या एकत्रित फोटोंमधून त्यांच्यातील बॉंड चा अंदाज येतो. 

या रिसेप्शन सोहळ्यासाठी करण जोहर, अजय देवगण-काजोल, करिना कपूर खान, मीरा राजपूत कपूर, रणवीर सिंग, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, राशी खन्ना, विद्या बालन, क्रिती सेनन, अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, शिल्पा शेट्टी, रितेश जिनिलिया, नेहा धुपिया  यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. 

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेतले. यानंतर कियाराने तिच्या लग्नाच्या फोटोंची झलक चाहत्यांना दाखवली होती. फोटोंमध्ये दोन्ही स्टार्स खूप आनंदी दिसत होते. कियारा अडवाणीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आता आमचे कायमचे बुकिंग झाले आहे. पुढील प्रवासासाठी आम्ही तुम्हाला प्रेम आणि आशीर्वाद देतो. 

टॅग्स :बॉलिवूडसिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीआलिया भटलग्न