Join us

Sid Kiara : 'सिद्धार्थ किआरा' च्या लग्नाच्या चर्चांना ब्रेक, घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 9:07 AM

सिद्धार्थ किआरा ही जोडी बॉलिवुडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दि. पार्टीमध्येही एकत्र दिसतात. त्यामुळे आता हे दोघे कधी लग्न करतील याचीच चर्चा जोरदार सुरु आहे.

Sid Kiara : बॉलिवुडमध्ये लग्नाचा सिझनच सुरु झाला आहे. अनेक जोड्या एका मागोमाग एक लग्नबंधनात अडकत आहेत. विराट अनुष्का पसून ते विकी कॅटरिना पर्यंत या जोड्यांचे लग्न चर्चेचा विषय होते. आता चाहत्यांना घाई झाली आहे ती 'राता लंबिया' जोडीची. म्हणजेच Shershah शेरशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी या जोडीची. अनेक दिवसांपासून या जोडीची लग्नाची सुरु झाली आहे अशी चर्चा होत आहे. मात्र आता आलेल्या बातम्यांनुसार एवढ्यात काही हे दोघे लग्न करणार नाहीत.

sid - kiara सिड किआरा ही जोडी शेरशाह सिनेमापासून जास्तच चर्चेत आहे. सिनेमातील त्यांचा रोमॅंटिक अॅंगल सर्वांनाच भावला होता. बॉलिवुडविश्वात तर त्यांना एकमेकांच्या नावावरुन उघडपणे चिडवले जाते. तसेच दोघेही बॉलिवुडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र एंट्री घेतात. पार्टीमध्येही एकत्र दिसतात. त्यामुळे आता हे दोघे कधी लग्न करतील याचीच चर्चा जोरदार सुरु आहे.

इतक्यात लग्न नाहीच 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी दोघांनी अद्याप लग्नाबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. तर दोघेही सध्या आपापल्या आगामी सिनेमांमध्येच व्यस्त आहेत. त्यामुळे इतक्यात त्यांचा लग्नाचा प्लॅन नाही असे समजत आहे. दोघांना करिअर मध्ये यश मिळत आहे. त्यामुळे सध्ये ते आपल्या करिअर कडेच लक्ष देणार असल्याचं कळत आहे.  त्यांच्या या निर्णयामुळे चाहते मात्र नक्कीच नाराज झाले आहेत. चाहत्यांना आता सिड किआरा च्या लग्नासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. 

तर नुकतेच किआराने Instagram Post इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना कोड्यात टाकले आहे. २ डिसेंबरला एक गुपित उघड करणार असे तिने म्हटले आहे. 

दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा चे मिशन मजनु, योद्धा आणि इंडियन पुलिस फोर्स हे चित्रपट येणार आहेत. त्याचे शुटिंग सुरु आहे. तर दुसरीकडे किआरा अडवाणीचा गोविंद नाम मेरा, सत्यप्रेम की कथा आणि तेलगु सिनेमा आरसी १५ येणार आहे.  

टॅग्स :लग्नसिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट