सिद्धार्थ मल्होत्राने प्रियांका चोप्राला घातली लग्नाची मागणी! प्रियांकाने दिला होकार!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 7:08 AM
होय, सिद्धार्थ मल्होत्राने प्रियांका चोप्राला लग्नाची मागणी घातली आणि प्रियांकानेही सिद्धार्थच्या या प्रपोजलला होकार देत, त्याचा स्वीकार केला. डबल धक्का ना?
बॉलिवूडचा हँडसम हिरो सिद्धार्थ मल्होत्रा आज अनेक हृदय यांने कालचा व्हॅलेन्टाईन डे कसा साजरा केला? आलिया भट्टसोबत? पण नाही. सिद्धार्थने कालचा व्हॅलेन्टाईन डे साजरा केला तो प्रियांका चोप्रा हिच्यासोबत. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. सिद्धार्थने केवळ प्रियांकासोबत व्हॅलेन्टाईन डे साजरा केला नाही तर चक्क गुडघ्यावर बसत तिला लग्नासाठी मागणीही घातली. आता प्रियांकाने सिद्धार्थचा हा प्रस्ताव मान्य केला की नाही, हे ऐकायला तुम्ही आतूर असाल, तर तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, सिद्धार्थने प्रियांकाला लग्नाची मागणी घातली आणि प्रियांकानेही सिद्धार्थच्या या प्रपोजलला होकार देत, त्याचा स्वीकार केला. डबल धक्का ना? पण थांबा...थांबा... तुम्ही समजताय तर अगदीच खरं नाही. म्हणजे, सिद्धार्थने प्रियांकाला प्रपोज तर केले...प्रियांकानेही त्याला होकार दिला...पण अर्थात हा सगळा घाट घातला गेला होता तो एका दागिणे बनवणाºया कंपनीच्या जाहिरातीसाठी. सध्या या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खुद्द प्रियांकाने ही जाहिरात तिच्या फेसबुक वॉलवर शेअर केली आहे. नेमक्या व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी ही जाहिरातीत प्रसिद्ध झाली. या जाहिरातीत सिद्धार्थ आणि प्रियांका दोघांमधील आॅनस्क्रीन रोमान्स तुम्ही पाहायलाच हवा. सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये बिझी आहे. ‘कॉन्टिको’ या अमेरिकरन मालिकेच्या शूटींगमध्ये प्रियांका व्यस्त आहे. लवकरच तिचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होतो आहे. याऊलट सिद्धार्थ ‘रिलोड’या चित्रपटात बिझी आहे. अलीकडे या चित्रपटाचे शूटींग सिद्धार्थने पूर्ण केले. या चित्रपटात सिद्धार्थसोबत जॅकलिन फर्नांडिस झळकणार आहे.