Join us

सिद्धार्थ मल्होत्राने प्रियंका चोपडाला घातली लग्नाची मागणी; प्रियंकानेही दिला होकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 10:56 AM

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने देसी गर्ल प्रियंका चोपडा हिला चक्क लग्नासाठी मागणी घातली आहे. धक्का बसला ना. पण हे ...

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने देसी गर्ल प्रियंका चोपडा हिला चक्क लग्नासाठी मागणी घातली आहे. धक्का बसला ना. पण हे खरं आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे. कारण या दोघांच्या अफेअर्सची अद्यापपर्यंत एकही बातमी समोर आली नाही. शिवाय काल-परवापर्यंत सिद्धार्थचे नाव तर अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याशी जोडले जात आहे. मग मध्येच प्रियंका आली तरी कोठून? पण सिद्धार्थने पिसीला रिअल लाइफमध्ये नव्हे तर रिल लाइफमध्ये लग्नाची मागणी घातली आहे.एका ज्वेलरी ब्रॅण्डच्या अ‍ॅडमध्ये सिद्धार्थ प्रियंकाला प्रपोज करतो. सुरुवातीला प्रियंका सिद्धार्थसमोर काही अटी ठेवते. त्यानंतर मात्र त्याच्या प्रपोजचा आनंदाने स्वीकार करते. या जाहिरातीत प्रियंका म्हणतेय की, महिलांचा हा नेहमीच आग्रह असतो की, त्यांचे पती त्यांना रोजच ‘मिस वर्ल्ड’ असल्याची अनुभूती देवोत. पुढे प्रियंका अशी म्हणते की, महिलांनी असा विचार का करू नये? कारण पतींचा सांभाळ करण्यात तर त्यांचे संंपूर्ण आयुष्य त्या व्यतित करीत असतात. दरम्यान, प्रियंकाच्या होकारासाठी सिद्धार्थ चांगलीच धडपड करताना दिसून येतो. त्यासाठी तो तिला अतिशय प्रामाणिकपणे तिने सांगितलेल्या अटी मान्य करतो. शिवाय तिला म्हणतोय की, ‘मी तर यापेक्षा अधिक गोष्टी मान्य करण्याचे ठरविले आहे.’ प्रियंका विचारते, ‘हे शक्य आहे काय?’ तेव्हा सिद्धार्थ म्हणतो, होय. पुढे म्हणतो, ‘मी तुला रिंग घालू शकतो काय?’ त्यावर प्रियंका म्हणते, ‘जर तुला माझ्या सर्व अटी मान्य असतील तर हे विचारण्याची गरजच काय?’ असो, सध्या सिद्धार्थचे नाव आलिया भट्ट हिच्याशी जोडले जात असून, प्रियंका सध्या हॉलिवूडमध्ये रमलेली आहे. नुकतेच तिच्या ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटाचा प्रीमियर पार पडला. त्यामध्ये प्रियंकाच्या लुकवरून चांगलीच चर्चा रंगली होती. चित्रपटातील मुख्य नायक ड्वेन जॉनसन याने तर तिच्यावर भावून मीडिया समक्ष तिला कीस केले होते.