Join us

सिद्धार्थ मल्होत्राच्या चित्रपटाला हिरोईन मिळेना, दिग्दर्शकाने घेताल हा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 15:17 IST

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तो एकता कपूरच्या 'शॉटगन शादी' आणि 'ये दिल मांगे ...

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तो एकता कपूरच्या 'शॉटगन शादी' आणि 'ये दिल मांगे मोर' आणि कन्नड सुपरहिट चित्रपट 'किरिक पार्टी'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. मात्र आता सिद्धार्थच्या 'किरिक पार्टी' चित्रपटाला काही अडचणींचा सामना करावा लागतोय. मीडिया रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्राने 'अय्यारी'च्या आधी  'किरिक पार्टी' साईन केला होता. मात्र तेव्हापासून आतापर्यंत या प्रोजेक्टला घेऊन काही खास काम झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपट रखडण्या मागचे कारण आहे याला अभिनेत्री मिळत नाहीय. सूत्रांच्या माहितीनुसार किरिक पार्टीचा दिग्दर्शक अशा अभिनेत्रीच्या शोधात आहे जी कॉलेजमधील अभिनेत्रीची भूमिका साकारु शकेल. मात्र आता दिग्दर्शकला अभिनेत्री मिळेनाशी झाली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थचा हा चित्रपट अडकून पडला आहे. आता या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चित्रपटात नवा चेहरा घेण्याचा विचार केला आहे.  सिद्धार्थचा काही महिन्यांपूर्वी आलेला अय्यारी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकलेला नाही. त्यामुळे तो एका हिटच्या शोधात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ अंधेरीतल्या जुहू परिसरात घर शोधतो आहे. सिद्धार्थ एकटाच हे घर शोधत नाहीय तर त्याच्या बरोबर जॅकलिनसुद्धा याच परिसरात घरं शोधते आहे.  विवेक ओबेरॉय आणि गोविंदाच्या घराजवळचे काही फ्लॉट्स त्यांना आवडले आहे. जॅक आणि सिद्धार्थला फ्लॉट्स एकमेकांच्या जवळ पाहिजे आहेत कारण त्यांना ज्यावेळी एकमेकांना भेटायची इच्छा झाली तर भेटू शकतात. ' ए जेंटलमन'  चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीक वाढल्याची चर्चा आहे.