Join us

सिद्धार्थसाठी Prayer Meetचं आयोजन; या पद्धतीने चाहत्यांना होता येईल सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 11:33 IST

Sidharth shukla online prayer meet : सिद्धार्थने जगाचा निरोप घेऊन आज ५ दिवस पूर्ण होत आहेत. म्हणूनच, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रार्थनासभेचं आयोजन केलं आहे.

ठळक मुद्देसिद्धार्थ शुक्लाच्या Prayer Meet मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन लिंक देण्यात आली आहे

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ४० व्या वर्षी अचानकपणे सिद्धार्थचं (Sidharth Shukla death) निधन झाल्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना धक्का बसला आहे. सिद्धार्थने जगाचा निरोप घेऊन आज ५ दिवस पूर्ण होत आहेत. म्हणूनच, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रार्थनासभेचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या प्रार्थनासभेत सिद्धार्थच्या चाहत्यांना सहभागी होता यावं यासाठी ही प्रेयर मीट ऑनलाइन ठेवण्यात आली आहे.

सिद्धार्थ शुक्लाचा मित्र आणि अभिनेता करणवीर बोहराने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सिद्धार्थसाठी आयोजित केलेल्या प्रार्थनासभेची माहिती दिली आहे. सोबतच या प्रार्थनासभेची वेळ आणि तारीखही सांगितली आहे. इतकंच नाही तर त्याने चाहत्यांना या शोकसभेत सहभागी होण्याचं आवाहनही केलं आहे. 

कधी आहे सिद्धार्थची प्रार्थनासभा?

सोमवारी( ६सप्टेंबर) संध्याकाळी ५ वाजता सिद्धार्थसाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रार्थनासभेत सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यासोबतच ब्रह्मकुमारी योगिनी दीदी यांच्या उपस्थितीत मेडिटेशन केलं जाणार आहे.

प्रार्थनासभेत कसं व्हाल जॉइन?

सिद्धार्थसाठी आयोजित केलेली प्रार्थना सभा युट्यूबवर प्रसिद्ध केली जाणार आहे. सोबतच http://tiny.cc/blessings_sidharth_shukla या लिंकवरुन चाहते सिद्धार्थच्या प्रार्थना सभेत सहभागी होऊ शकतात.