छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज ( २ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 'बालिका वधू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले सिद्धार्थने वयाच्या केवळ ४० व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. कलाविश्वाप्रमाणेच सिद्धार्थ सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टिव्ह होता. विशेष म्हणजे सिद्धार्थच्या निधनानंतर त्याचं ४ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्याने मृत्यूविषयी भाष्य केलं होतं.
"मृत्यू होणं हे आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं नुकसान नाही. पण, जीवन जगत असताना आपण मनातल्या ज्या इच्छा मारतो त्यालाच खरं मरण म्हणतात", अशा आशयाचं ट्विट सिद्धार्थने २०१७ मध्ये केलं होतं.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती भावुक; म्हणाली...
दरम्यान,सिद्धार्थने मॉडेल म्हणून कलाविश्वात करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने त्याने 'बाबुल का आंगन छुटे' , 'जाने पहचाने से...ये अजनबी', 'लव यू जिंदगी', 'जब वी मेट' आणि 'बालिका वधु' या मालिकांमध्ये काम केलं होतं.