दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala) याची आई चरण कौर (Charan Kaur) वयाच्या ५८ व्या वर्षी गरोदर आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कोणत्याही क्षणी त्या बाळाला जन्म देणार आहेत. सिद्धू मूसेवाला हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हत्येनंतर चरण कौर या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत. आयव्हीएफ(IVF) च्या माध्यमातून त्या गरोदर राहिल्या असून या वयात आई होणार असल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.
चंदीगढच्या खाजगी रुग्णालयात चरण कौर यांना दाखल करण्यात आलं आहे. कोणत्याही क्षणी त्या बाळाला जन्म देणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दुसऱ्या गरोदरपणाची बातमी आली होती तेव्हा सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. सिद्धूचे आईवडील त्याच्या लहान भाऊ/बहिणीचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. बऱ्याच महिन्यांपासून सिद्धूच्या आई वडिलांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणं बंद केलं होतं. ते सिद्धूच्या चाहत्यांनाही भेटत नव्हते. सिद्धूची आई चरण कौर या स्वत: राजकारणाशी संबंधित आहेत. त्या मूसा गावाच्या सरपंचही राहिल्या आहेत. काँग्रेसच्या च्या समर्थक आहेत. स्वत: सिद्धूने काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती मात्र आम आदमी पार्टीच्या उमेदवाराकडून त्याला हार पत्करावी लागली.
२९ मे २०२२ रोजी गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी नंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. एकुलत्या एक लेकाच्या हत्येने आई वडिलांना जबर धक्का बसला. यानंतर त्यांनी दुसऱ्या प्रेग्नंसीवर विचार केला. तर काही दिवसांपूर्वी सिद्धूचे काका चमकौर सिंह यांनी चरण कौर यांच्या प्रेग्नंसीची बातमी कन्फर्म केली. ५८ व्या वर्षी त्या आई होणार आहे. सिद्धू मुसेवालाची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे ज्याचा कोणीही वारस नव्हता.