Join us

सिद्धू मूसेवालाच्या छोट्या भावाचा व्हिडिओ पाहिलात का?, वयाच्या ५८ व्या वर्षी आईने दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:23 IST

१७ मार्च रोजी सिद्धूच्या मूसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला. त्याचं नाव शुभदीप ठेवण्यात आलं.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची (Sidhu Moosewala) दोन वर्षांपूर्वी हत्या झाली. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. सिद्धूचे आईवडीलही शोकसागरात बुडाले. आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू पाहून ते पूर्णपणे कोसळले. यानंतर दोन वर्षांनी सिद्धूच्या आई वडिलांनी पुन्हा बाळाचा विचार केला. सिद्धूच्या आईने वयाच्या ५८ व्या वर्षी आयव्हीएफ च्या साहाय्याने मुलाला जन्म दिला. १७ मार्च २०२३ रोजी त्यांना मुलगा झाला. त्याच्या रुपाने सिद्धूच परत आल्याचं सर्वांना वाटलं. सिद्धूच्या छोट्या भावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

१७ मार्च रोजी सिद्धूच्या मूसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला. त्याचं नाव शुभदीप ठेवण्यात आलं. छोटा शुभदीप आता ६ महिन्यांचा झाला आहे. आईवडिलांसोबतचा त्याचा मस्ती करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शुभदीपची आई चरणकौर आणि वडील बलकौल सिंह त्याला खेळवत आहेत. त्याला काळा शर्ट, शॉर्ट्स आणि डोक्यावर टोपी घातली आहे. चिमुकला शुभदीप या व्हिडिओत खूप गोंडस दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहून सिद्धू मूसेवालाचे डायहार्ड चाहतेही भावनिक झाले आहेत. सर्वच सिद्धूची आठवण काढत आहेत. तसंच त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी प्रार्थना करत आहेत. २९ मे २०२२ रोजी सिद्धू मूसेवालावर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्सच्या शूटर्सने ही हत्या केली होती. तेव्हा सिद्धू केवळ २८ वर्षांचा होता. त्याला न्याय देण्यासाठी चाहते कुटुंबासोबत रस्त्यावर उतरले होते.

टॅग्स :सिद्धू मूसेवालापरिवारसोशल मीडियासंगीतपंजाब