सलमान खानच्या (salman khan) आगामी 'सिकंदर' (sikandar) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. पुढील काही दिवसांमध्ये 'सिकंदर' सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे. ईदच्या निमित्ताने 'सिकंदर'ची सलमानच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. अशातच 'सिकंदर'निमित्त सलमानच्या विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मुलाखती व्हायरल होत आहेत. सलमान वैयक्तिक आयुष्यात कोणत्या धर्माला फॉलो करतो असं त्याला विचारण्यात आलं. त्यावेळी सलमानने दिलेलं खास उत्तर चर्चेत आहे.
सलमान या धर्माला करतो फॉलो२०१७ ला काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानच्या मुलाखती घेण्यात आल्या तेव्हा अभिनेत्याला तो कोणत्या धर्माचं पालन करतो असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सलमान म्हणाला की,"मी मुसलमान आहे पण मी हिंदू धर्माला मानतो. याशिवाय मी एक भारतीय असून तो सुद्धा माझा धर्म आहे." अशाप्रकारे सलमानने अत्यंत अभिमानाने आणि गर्वाने धर्माविषयी उत्तर दिलं होतं.
याशिवाय सलमानचे वडील सलीम खान यांनीही याआधी धर्माबद्दल वक्तव्य केलं होतं. सलीम खान म्हणाले होते की, "मी मुसलमान आहे पण माझी पत्नी हिंदू आहे. त्यामुळे माझ्या सर्व मुलांची जडणघडण स्वतंत्र अशा मूल्यांनी झाली आहे. माझ्यासाठी ईद आणि गणेश चतुर्थी दोन्ही सणांना महत्व आहे. सलमान स्वतःला हिंदू किंवा मुसलमान म्हणत नाही. तो स्वतःला एक चांगला व्यक्ती मानतो." अशाप्रकारे सलमान आणि त्याचे वडील सलीम यांनी धर्माबद्दल वक्तव्य केलं होतं. दरम्यान सलमानचा 'सिकंदर' सिनेमा ३० मार्चला रिलीज होतोय. या सिनेमात सलमान खानसोबतरश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, शर्मन जोशी हे कलाकार झळकणार आहेत.