Join us  

सलमान खानच्या 'सिकंदर' मध्ये रश्मिकानंतर आणखी एका साऊथ अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 4:20 PM

'सिकंदर' मध्ये रश्मिका मंदाना दिसणार हे माहितच आहे. पण आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

सलमान खानचा (Salman Khan) आगामी बहुप्रतिक्षित सिनेमा 'सिकंदर' (Sikandar) चं शूट सुरु आहे. सलमान थान जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. जेव्हापासून अभिनेत्याच्या या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून यासंबंधी प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'सिकंदर' मध्ये रश्मिका मंदाना दिसणार हे माहितच आहे. पण आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

ए आर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' मध्ये सलमान खान चा डॅशिंग अवतार पाहायला मिळेल. चुकीच्या लोकांसोबत वाईट आणि चांगल्या लोकांसोबतच चांगलं, भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढताना तो दिसणार आहे. सिनेमात श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाची एन्ट्री झालीच आहे. तर आता आणखी एका अभिनेत्रीचं ही नाव कन्फर्म झाल्याची चर्चा आहे. ही आहे 'सिंघम' फेम अभिनेत्री काजल अग्रवाल. आता ती नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.  रश्मिका आणि काजलशिवाय सिनेमात बाहुबली फेम 'कटप्पा' म्हणजेच सत्यराज आणि प्रतीक बब्बर यांचीही भूमिका आहे. प्रतिक यामध्ये खलनायक साकारत आहे. 

काजल अग्रवालने यापूर्वी 'सिंघम' सिनेमात अजय देवगणसोबत रोमान्स केला होता.  'सिकंदर' सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. सलमान खान बरगड्यांच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. तरी याही अवस्थेत तो सिनेमाचं शूट करत आहे. नुकतंच त्याने 'बिग बॉस 18' चा प्रोमोही शूट केला. याशिवाय सलमान 'टायगर व्हर्सेस पठाण' सिनेमातही शाहरुख खानसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :सलमान खानकाजल अग्रवालसिनेमाबॉलिवूड