Join us

सलमान खानला मोठा धक्का, एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला 'सिंकदर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:11 IST

सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे.

Sikandar Online Leak In HD: बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा (Salman Khan) 'सिकंदर' सिनेमा आज अखेर प्रदर्शित झाला. ईदच्या मुहुर्तावर भाईजानने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं.  थिएटरमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. लोक सोशल मीडियावर चित्रटाचा रिव्ह्यू करत आहेत. पण आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी निर्मात्यांना काळजीत टाकणारी आहे. कारण हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट  एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. 

ट्रेड विश्लेषक कोमल नहाटा यांनी चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचा दावा केलाय. त्यांनी X वर (पुर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे.  'सिकंदर' बेकायदेशीर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आला आहे. पायरसी कंटेट देणाऱ्या वेबसाइटवर 'सिकंदर' चित्रपट दाखवला जात आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तमिळरॉकर्स, इबोम्मा, मुव्हीरुल्झ, फिल्मीझिला, तमिळब्लास्टर्स आणि टेलिग्राम ग्रुप सारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.  साजिद नाडियाडवाला यांच्या चित्रपटाला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई होत असताना अशाप्रकारे ऑनलाइन लीक झाल्याचा फटका सिनेमाच्या कमाईवर होऊ शकतो.

सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'सिकंदर' हा २०२५ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. सलमान आणि रश्मिकाशिवाय सिनेमात सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे.  २०० कोटींचं बजेट असेलला सलमानचा सिनेमा  पहिल्या दिवशी ६० कोटींचं कलेक्शन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण, आता हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे जर हा बहुप्रतीक्षित चित्रपट मोफत पाहता येत असेल तर प्रेक्षक थिएटरमध्ये जाणार नाहीत. यामुळे निर्मात्यांना कमाईच्या बाबतीत मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूड