'सिकंदर' (sikandar) सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 'सिकंदर' सिनेमाविषयी वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत. सलमान खान (salman khan) या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. 'सिकंदर' सिनेमाचं पहिलं पोस्टर आज रिलीज येणार होतं. आज निर्माते साजिद नाडियादवाला (sajid nadiyadwala) यांच्या वाढदिवशी हे पोस्टर रिलीज करण्यात येणार होतं. अखेर नुकतंच 'सिकंदर'चं पोस्टर रिव्हिल करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये सलमानचा अँग्री यंग मॅन अंदाज दिसतोय.
'सिकंदर'चं पहिलं पोस्टर
साजिद नाडियादवाला निर्मित 'सिकंदर' सिनेमाचं पहिलं पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरमध्ये सलमानचा अँग्री यंग मॅन अंदाज पाहायला मिळतोय. शांत आणि भेदक नजर असलेला सलमान खानचा डॅशिंग लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. भाईजानच्या चेहऱ्यावर हिरव्या आणि लाल रंगाची शेड दिसतेय. एकूणच 'सिकंदर' हा सलमानच्या करिअरमधील महत्वाचा सिनेमा ठरणार यात शंका नाही. 'सिकंदर'चं पोस्टर रिलीज होताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
कधी रिलीज होणार 'सिकंदर'
सर्वांना उत्सुकता होती 'सिकंदर'च्या रिलीज डेटची. तर सिनेमाच्या पोस्टरसोबत 'सिकंदर'ची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 'सिकंदर' सिनेमा याचवर्षी २०२५ च्या ईदमध्ये रिलीज होणार आहे. म्हणजेच २८ मार्च २०२५ ला 'सिकंदर' सिनेमा रिलीज व्हायची शक्यता आहे. आमिर खानच्या 'गजनी' सिनेमाचे दिग्दर्शक ए.आर.मुरुगोदास यांनी 'सिकंदर' सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर हे कलाकार दिसणार आहेत.