Salman Khan: बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान याच्या 'सिकंदर' (Salman Khan Sikandar movie ) या चित्रपटाची देशभरात चर्चा आहे. हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होते, याची वाट सलमान खानचे चाहते पाहात आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना तो खूप आवडला असून ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज आम्ही तुम्हाला चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या फीबद्दल सांगणार आहोत.
'सिकंदर' चित्रपटात सलमान खान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना ही मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसेल. Filmibeat रिपोर्टनुसार, सलमान खानने हे पात्र साकारण्यासाठी १२० कोटी रुपये मानधन आकारले आहे. तर रश्मिका मंदानाने या चित्रपटासाठी ५ कोटी रुपये घेतले आहेत. या सिनेमात काजल अग्रवालदेखील आहे. तिने 'सिकंदर'साठी ३ कोटी रुपये फी घेतली आहे. शर्मन जोशीला ७५ लाख रुपये मानधन मिळालं आहे.
'सिकंदर' चित्रपटात प्रतीक बब्बर अतिशय महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटासाठी त्याला ६० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे. तर नवाब शाहने चित्रपटात काम करण्यासाठी ३० लाख रुपये घेतले आहेत. सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट २०० कोटी रुपये आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नेमकी काय कमाल करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.