ठळक मुद्दे70 च्या दशकात सिमीने बोल्ड अभिनेत्री अशी ओळख निर्माण केली.
पोलीस उपअधीक्षक दविंदरसिंग यांना गत शनिवारी हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी व एका कार्यकत्यासोबत अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारला चहुबाजूंनी घेरले आहे. याचदरम्यान राजधानी दिल्लीत ऐन प्रजासत्ताक दिनाच्या तोंडावर तीन अतिरेकी पकडले गेलेत. यानंतर दिल्ली पोलिस अलर्टवर आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल हिने एक ट्वीट केले आणि सगळीकडे खळबळ माजली. ‘ दिल्लीत दहशतवादी येतात... प्रजासत्ताक दिनी बॉम्ब स्फोट झाला असता, शेकडोंचा मृत्यू पडले असते. मुस्लिमांच्या माथी दोष आणि तेच लक्ष्य झाले असते, काय हीच पटकथा होती?’ असे ट्वीट सिमीने केले. तिच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर जणू खळबळ माजली. अनेकांनी तिच्याविरोधात मोर्चा उघडला.
एका युजरने तर सिमीच्या या ट्वीटनंतर तिला अटक करण्याची मागणी करत, गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांना टॅग केले. अन्य एका युजरनेही सिमीला लक्ष्य करत, ‘तुझे कुटुंब भारतात शरणार्थी म्हणून आले होते का?’ असा सवाल केला.
यावर रिप्लाय करताना सिमी पुन्हा एक ट्वीट करत, माझ्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी देशाची सेवा केली. ते सर्व आर्मी आॅफिसर होते. ते देशासाठी शौर्याने लढले, असे लिहिले.सिमी ग्रेवाल ही बॉलिवूडची एकेकाळची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. तिचा जन्म दिल्लीत झाला. पण ती लहानाची मोठी झाली ती इंग्लंडमध्ये. वयाच्या 15 व्या वर्षी सिमीला ‘टार्जन गोज टू इंडिया’ हा सिनेमा आॅफर झाला. पहिल्याच चित्रपटात तिला फिरोज खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि सिमीने या संधीचे सोने केले. तिच्या अभिनयाचे वारेमाप कौतुक झाले. पुढे राज कपूर, सत्यजीत रे, मृणाल सेन आणि राज खोंसला यासारख्या दिग्गजांच्या चित्रपटात सिमी झळकली.70 च्या दशकात सिमीने बोल्ड अभिनेत्री अशी ओळख निर्माण केली. बॉलिवूडचा पहिला न्यूड सीन कुण्या अभिनेत्रीने दिला तर सिमीने. होय, 1972 मध्ये रिलीज झालेल्या ‘सिद्धार्थ’ या सिनेमात सिमीने न्यूड सीन देऊन खळबळ उडवली होती. हा बॉलिवूडचा पहिला न्यूड सीन होता.