Join us

कंगना राणौत- क्रिश वादात अपूर्व असरानीची उडी! ‘मणिकर्णिका’ला म्हटले फ्लॉप!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 2:51 PM

कंगना राणौत- क्रिश वादात ‘सिमरन’ या चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनीही उडी घेतली आहे.

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ एकीकडे बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. दुसरीकडे या चित्रपटाच्या निमित्ताने कंगना टीकेची धनी ठरतेय. खरे तर सुरुवातीपासूनचं कंगनाच्या या चित्रपटाने वाद ओढवून घेतलेत. आधी कंगनाला वैतागून  सोनू सूूदने या चित्रपटातून अंग काढून घेतले. मग दिग्दर्शनाच्या क्रेडिटवरून कंगना वादात सापडली. रिलीजच्या अगदी तोंडावर करणी सेनेने या चित्रपटाला विरोध केला. रिलीजनंतर या सर्व वादांवर पडदा पडेल, असे वाटले होते. पण क्रेडिटचा वाद आणखीच तापला. आता तर या वादात ‘सिमरन’ या चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनीही उडी घेतली आहे.

‘मणिकर्णिका’ रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनावर आगपाखड केली होती. कंगनाने एका सोन्यासारख्या चित्रपटाची माती केली.  ‘मणिकर्णिका’चे ७० टक्के दिग्दर्शन मी केले आहे. मी रिलीज होईपर्यंत गप्प राहिलो. चित्रपटासाठी ज्या टीमने मेहनत केली त्यांच्यासाठी मला गप्प रहावे लागले. पण कंगनाने काय केले याबद्दल आता बोललो नाही तर माझ्या मेहनतीवर पाणी सोडल्यासारखे होईल.  मी केलेले दिग्दर्शन शु्ध्द सोन्यासारखे होते, कंगनाने त्याची माती केली, असे क्रिश म्हणाले होते. आता अपूर्व असरानीनेही यानिमित्ताने क्रिश यांची बाजू घेत कंगनाला लक्ष्य केले आहे.

‘तू एका ज्येष्ठ दिग्दर्शकाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हायजॅक केला. एका दुसºया दिग्दर्शकाला घेतले. पण चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यालाही हाकलले आणि स्वत:च दिग्दर्शक असल्याचा दावा करू लागली. ट्रेड आणि प्रेस तुझ्या सैतानी फसवणूकला पाठींबा देत आहे. पण इतके करूनही तू एक फ्लॉप चित्रपट बनवलास,’असे अपूर्व यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

‘सिमरन’ या  चित्रपटाच्या रिलीजवेळी कंगना आणि अपूर्व यांचा वाद चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा अपूर्वने लिहिली आहे. पण अचानक चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय कंगनाला विभागून दिले गेले. पटकथेचे सगळे श्रेय कंगना लाटत असलेली पाहून अपूर्व भलताच संतापला होता.  

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी