Join us  

गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 11:30 AM

अदनान सामीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आईचं निधन झालंय (adnan sami)

लोकप्रिय गायक आणि बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गाणारे अदनान सामी यांची आई बेगम नौरीन सामी खान यांचं निधन झालंय. वयाच्या ७७ व्या वर्षी अदनानच्या आईने अखेरचा श्वास घेतला. अदनान यांनी आज सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वांना सांगितली. ही दुःखद बातमी समोर येताच अदनानच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून अदनानच्या आईला श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केलाय.

आईच्या निधनानंतर अदनानची भावुक पोस्ट

अदनान यांनी आईचा फोटो पोस्ट करुन त्याखाली भावुक पोस्ट लिहिली आहे. अदनान लिहितीत, "माझी आई बेगम नौरीन सामी खान यांच्या निधनाची बातमी सांगताना मला खूप दुःख होतंय. आईच्या निधनामुळे आम्ही शोकसागरात बुडालो आहोत. माझी आई एक अविश्वसनीय स्त्री होती. माझ्या आईच्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांना कायम आईने प्रेम आणि आनंद दिलाय. मला तिची खूप आठवण येईल. आईसाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा. माझ्या प्रिय आईच्या आत्म्याला शांती मिळो"

अदनान सामी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'बजरंगी भाईजान' सिनेमातलं अदनानने गायलेलं 'भर दो झोली मेरी' हे गाणं प्रचंड गाजलं. अदनान गेल्या अनेक वर्षांपासून श्रवणीय गाण्यांनी मनोरंजन विश्वात चांगलेच सक्रीय आहेत. अदनान यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचं वजन कमी करुन जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं. आगामी कसूर सिनेमात अदनान यांचं गाणं पुन्हा ऐकण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे.

टॅग्स :अदनान सामीबॉलिवूड