भारतीय गायनविश्वातील प्रख्यात गायिका म्हणजे आशा भोसले.आशा भोसलेंनी गायलेली गाणी गेली अनेक दशकं लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. 'मेरा कुछ सामान', 'राधा कैसे ना जले', 'तुमसे मिलके' या हिंदी गाण्यांपासून ते 'फिटे अंधाराचे जाळे', 'धुंदी कळ्यांना', 'ऋतू हिरवा' ही मराठी गाणी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहेत. आशा भोसले यांनी वयाची नव्वदी ओलांडली तरीही आजही त्या सळसळत्या एनर्जीने सर्वांना प्रेरीत करतात. आशा भोसलेंचा यांचा एक व्हिडीओ नुकताच रिलीज झालाय. यात त्या विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्याची हूक स्टेप करताना दिसत आहेत.
आशा भोसलेंनी केला विकी कौशलच्या गाण्यावर डान्स
इंंन्स्टाग्रामवर आशा भोसलेंच्या एका कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत आशा भोसले कॉन्सर्टदरम्यान 'तौबा तौबा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या श्रवणीय आवाजात खास अंदाजात 'तौबा तौबा' गाणं गायलं. इतकंच नव्हे तर गाता गाता त्यांनी या गाण्याची हूक स्टेप केली. आशा भोसलेंनी या खास अंदाजात अचानक उपस्थित हजारो प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. 'करण औजला (तौबा तौबाचा लेखक) आणि विकी कौशल' हा व्हिडीओ नक्की बघा असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
तौबा तौबाच्या गीतकाराची प्रतिक्रिया
हा व्हिडीओ पाहून 'तौबा तौबा' गाण्याचा गायक करण औजलाने प्रतिक्रिया देऊन सांगितलं की, "आशा भोसलेजी. संगीत क्षेत्रातील देवी. त्यांनी आताच तौबा तौबा गाणं गायलं. एका लहान मुलाने लिहिलेलं हे गाणं जो एका छोट्या गावात वाढलाय. त्याच्या कुटुंबाला संगीताची कोणती पार्श्वभूमी आहे. परंतु अशा व्यक्तीला संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी दिलेलं प्रेम कधी विसरता येणार नाही. मी सर्वांचा आभारी आहे. २७ वर्षांचा असताना मी हे गाणं लिहिलेलं. ९१ व्या वर्षी आशा भोसलेंनी खूपच छान गायलं"