गायक अतिफ अस्लमचे जगभरात अनेक चाहते आहेत. अतिफ सुद्धा त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही. तो विविध गाणी गाऊन चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतो. अशातच अतिफच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एक प्रकार घडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. लाईव्ह कॉन्सर्ट चालू असताना अतिफची चाहती त्याला भेटण्यासाठी थेट स्टेजवर आली. आणि मग पुढे काय घडलं बघा...
झालं असं की.. सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायक जो भारतीयांमध्येही लोकप्रिय आहे असा अतिफ अस्लम. अतिफची काल बांग्लादेशमधील ढाका येथे लाईव्ह म्यूझिक कॉन्सर्ट होती. त्यावेळी एक चाहती अतिफला भेटायला थेट स्टेजवर आली. तिने अतिफला घट्ट मिठी मारली. काही वेळ तिने मिठी सोडलीच नव्हती. ती जोरजोरात अतिफला I LOVE YOU असं म्हणत होती. अतिफ हे सर्व घडत असताना शांत होता.
पुढे त्या चाहतीने अतिफच्या हाताला किस केलं. अतिफने सुद्धा चाहतीच्या प्रेमाचा स्वीकार केला. अन् शेवटी तिला निरोप देताना अतिफने खाली वाकून आदर दर्शवला. अतिफचा लाईव्ह कॉन्सर्टमधला हा व्हिडीओ चांगलाच गाजलाय. याशिवाय अतिफने चाहतीसोबत केलेल्या कृतीचंही सगळीकडे कौतुक होतंय. क्वचितसमयी फॅनने अशी कृती केल्याने कलाकार नाराज होतात. पण अतिफने शांतपणे ही परिस्थिती हाताळली, त्यामुळे सर्वांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय