Join us  

Badshah Car Collection: 3.15 कोटींची लॅम्बोर्गिनी तर 6 कोटींची रोल्स रॉयस, बादशाहचे कार कलेक्शन पाहून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 2:59 PM

Badshah Car Collection: बॉलिवूडचा रॅप किंग बादशाह आपल्या नावाप्रमाणेच एखाद्या राजाचे आयुष्य जगतो.

Badshah Luxurious and Expensive Cars: गेल्या काही रॅप गाण्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. युट्यूबवरुन सुरू झालेला रॅपचा प्रवास आता मोठ-मोठ्या चित्रपटांपर्यंत येऊन पोहचला आहे. या रॅपने इंडस्ट्रीला अनेक जबरदस्त सिंगर्स दिले, या यादीत सिंगर बादशाहचे नाव येते. लहान म्युझिक अल्बममधून गायला सुरुवात केलेल्या बादशाने बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमवले आहे. पण, आज आपण बादशाहच्या गाण्यांबद्दल नाही तर त्याच्या जबरदस्त कार कलेक्शनबद्दल बोलणार आहोत.

लॅम्बोर्गिनी उरुस-3.15 कोटीबादशहाला महागड्या आलिशान गाड्यांचा शौक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी उरुसचा समावेश आहे. ही कार जितकी आलिशान आहे तितकी तिची किंमतही जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बादशाहने नुकतीच ही कार खरेदी केली आहे. याची किंमत सुमारे 3.15 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. 

ऑडी QD-1.23 कोटीकेवळ लॅम्बोर्गिनीच नाही तर बादशाहकडे ऑडी क्यूडी देखील आहे. ऑरेंज मेटॅलिक कलरची ही कार दिसायलाही अतिशय सुंदर आणि विविध फीचर्सनी भरलेली आहे. या कारची किंमत 1.23 ते 1.67 कोटींच्या दरम्यान आहे. बादशाह अनेकदा या कारमधून प्रवास करताना दिसतो.

Rolls Royal Wraith- 5.90 कोटीरोल्स रॉयस सारखी कार घेणे हे प्रत्येक स्टारचे स्वप्न असते, तर सामान्य माणसासाठी ते फक्त एक स्वप्नच असते. या कारची किंमत पाहून कोणाचेही डोळे चक्रावून जावू शकतात. 5.90 कोटी किमतीची ही कार सध्या बादशाहांच्या गॅरेजची शोभा आहे. बादशाहने ही कार  विकत घेतल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली होती.

टॅग्स :बादशहाकार