प्रसिद्ध पंजाबी पॉप स्टार गुरू रंधावावर कॅनडामधील वैंकूवर येथे एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. गुरू रंधावा कॅनडामध्ये विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कॉन्सर्ट करत होता. वैंकूवरमध्ये रविवारी रात्री त्याचा शेवटचा शो होता. कॉन्सर्ट संपल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार लाइव्ह परफॉर्मन्सवेळी वैंकूवरच्या क्वीन एलिजाबेथ थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीनं मागून येऊन गुरू रंधावाच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. सोशल मीडियावर गायकाचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्यावर हल्ला केलेला पहायला मिळतोय.
पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणाला अटक केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार हे काम कोणत्यातरी कॅनडात वास्तव्यात असलेल्या भारतीयाचं असेल.