दिलजीतनंतर पंजाबी गायक जस्सी कंगनावर भडकला, म्हणाला - चापलूसीला काहीतरी सीमा असावी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 12:23 PM2020-12-03T12:23:41+5:302020-12-03T12:24:40+5:30
गायक-अभिनेता दिलजीत दोसांजने कंगना रनौतवर निशाणा साधल्यावर आता गायक जस्सीने कंगनाला खडे बोल सुनावले आहेत.
कंगना रनौत शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. गेल्या काही दिवसात कंगना या आंदोलनावरून काही ट्विट्स केले आहेत. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत एक ट्विट केलं होतं. ज्यावर गायक जस्सीने कंगनाला दिलेलं उत्तर व्हायरल झालं आहे.
कंगनाने ट्विट करत लिहिले होते की, मोदीजी किती समजावतील, किती वेळा समजावतील? शाहीन बागमध्ये रक्ताच्या सांडणाऱ्यांना चांगलं माहीत होतं की, त्यांची नागरिकता कुणीतरी हिसकावून घेत नाहीये. पण तरी त्यांनी दंगे केले, देशात आतंक पसरवला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जिंकले. या देशाला गरज आहे धर्म आणि नैतिक मूल्यांची...
मुम्बई नगर निगम ने एक चबूतरा तोड़ा था तो दुनिया सिर पे उठाये घूमती थी। किसान की माँ ज़मीन दांव पर लगी है और बात करती है समझाने की। किसान के हक़ नहीं बोल सकती तो उसके ख़िलाफ़ तो मत बोलो @KanganaTeam ।
— Jassi (@JJassiOfficial) December 1, 2020
चापलूसी और बेशर्मी की भी कोई हद होती है। #FarmersAbovePolitics#Farmershttps://t.co/QJRTBK28cH
जस्सी म्हणाला निर्लज्जपणाला हद्द असावी
मुंबई महापालिकेने एक उंबरठा तोडला होता तर जगाला डोक्यावर घेऊन फिरत होती. शेतकऱ्याची आई असलेली जमिन पणाला लागली आहे आणि हे गोष्ट करते समजावण्याची. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बोलू शकत नाही तर मग विरोधात तरी नको बोलू. चापलूसी आणि निर्लज्जपणाचीही काही हद्द असते.
कंगनाचं उत्तर
जस्सीच्या या ट्विटवर कंगनाने उत्तर दिलं की, जस्सीजी इतका राग का येतोय तुम्हाला. #FarmersBill2020 is a revolutionary bill, this will take farmers to new heights of empowerment, मी तर केवळ शेतकऱ्यांच्या हक्काबाबत बोलते आहे. तुम्ही कुणाच्या हक्काबाबत बोलत आहात माहीत नाही.
जस्सीचं पुन्हा सडेतोड उत्तर
कंगनाजी हे कोणतं रेव्होल्युशन आहे जे शेतकऱ्यांनी समजत नाहीये केवळ तुम्हाला आणि सरकारी ट्विटर ट्रोलर्सना समजत आहे? मी पूर्ण बील वाचलं आहे. त्यात रेव्होल्युशन शेतकऱ्यांसाठी नाही तर प्रायव्हेट प्लेअर्स आणि उद्योगपतींसाठी आहे. शेतकरी त्यांच्या चांगल्या वाईटाचा विचार करू शकतात. तुम्ही त्यांचा विचार करू नका.