Join us

Jubin Nautiyal: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालला झाली गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 12:24 IST

कबीर सिंग , मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटांतील  गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियालचा अपघात झाला आहे.

कबीर सिंग , मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटांतील  गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियालला गुरुवारी जिन्यावरुन खाली पडला आहे.  यादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली आहे.जुबिन नौटियालला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुबिनच्या डोक्याला, बरगड्या आणि कोपरला दुखापत झाली आहे.  अपघातानंतर त्याच्या उजव्या हाताचे ऑपरेशन होणार आहे. डॉक्टरांनी त्याला उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जुबिन नौटियालचे नवं गाणे तू सामना आये नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे त्यांनी गायक योहानीसोबत गायले आहे. गुरुवारी नौटियाल आणि योहानी गाण्याच्या लाँचच्या वेळी एकत्र दिसले. यानंतरच त्याला दुखापत झाली. 

गायक जुबिन नौटियालने मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे. अलीकडे त्याची एकापाठोपाठ एक गाणी रिलीज झाली आहेत. यामध्ये माणिकेचे योहानी आणि गोविंदा नाम मेरा या चित्रपटातील बना शराबी या गाण्यातील तू सामना आये यांचा समावेश आहे.

 

2014 मध्ये  जुबिनने ‘सोनाली केबल’ साठी पहिलं गाणं गायलं आणि यानंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. अलीकडे आलेल्या ‘कबीर सिंग’ या सिनेमातील ‘तुझे कितना चाहें और हम’ या जुबिनने गायलेल्या गाण्यानं तर कमाल केली. हे गाणं तुफान लोकप्रिय झालं जुबिनने तामिळ, तेलगू, कन्नड व बंगाली सिनेमांसाठीही अनेक गाणी गायली आहेत.

 

 

टॅग्स :सेलिब्रिटीहॉस्पिटल