आपल्या आवाजाची मोहिनी घालून पार्श्वगायक आणि अभिनेते किशोर कुमार यांनी संपूर्ण जगाला घातली होती. आजही इतक्या वर्षांनी त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. त्यांच्या गाण्यांइतकीच त्यांची प्रेमप्रकरणही चर्चेत राहिली.
किशोर कुमार यांनी पहिलं लग्न 1951मध्ये अभिनेत्री रूमा गुहा यांच्यासोबत झाले होते.लग्नाच्या आठ वर्षांनंतर 1958मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी किशोर दा बॉलिवूडमध्ये इतके नावाजलेले नव्हते. याचं मुख्य कारण म्हणजे, किशोर दा आणि रूमा यांच्यातील करिअरबाबत झालेले वाद. खरं तरकिशोर यांना लग्नानंतर रूमाने घर सांभाळावं असं वाटत होतं. पण रूमाला मात्र चित्रपटसृष्टीमध्ये करिअर करायचं होतं.
रूमाशी घटस्फोट झाल्यानंतर किशोर कुमार यांनी अभिनेत्री मधुबाला यांच्यासोबत संसार थाटला. त्यावेळी मधुबालाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ केलं होतं. पण किशोर कुमार यांचा मधुबाला यांचा संसार फार काळ चालला नाही कारण हृदयाला असलेल्या छिद्रामुळे मधुबाला यांचं निधन झालं आणि त्यांनीही अर्ध्यातच किशोरदांची साथ सोडली.
मधुबाला यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली आल्या. या दोघांमधील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केलं. 1976मध्ये दोघांनी लग्न केलं त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच यांचा संसार मोडला आणि त्यानंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं होतं.
त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एंट्री झाली ती अभिनेत्री लीना चंदावरकर यांची. हे त्यांचे चौथे आणि शेवटचं लग्न होते. लीना आणि किशोर यांच्या वयात 21 वर्षांचं अंतर असल्याने त्यामुळे किशोर यांचे आई-वडील या नात्याच्या विरोधात होते.