Join us

Singer KK Dies At 53 : मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधी सिंगर केकेनं गायलं होतं हे गाणं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 12:04 IST

Singer KK Dies At 53: वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांनी जगाचा निरोप घेतला आणि सर्वांना धक्काच बसला.

केके (Singer KK) या नावाने प्रसिद्ध असलेला गायक कृष्णकुमार कुननाथचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नझरूल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जेव्हा केके सुमारे एक तास गाऊन त्यांच्या हॉटेलवर परतला तेव्हा त्याला अस्वस्थ वाटत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गायकाला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गायक केकेच्या अंतिम परफॉर्मन्सची अनेक झलक सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. कॉन्सर्ट दरम्यान केकेने 'हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल...'', 'आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल, तू जो मिला तो हो गया सब हासिल, नहीं कुछ भी, नहीं कुछ भी...' यासारखी गाणी गायली. 

सोशल मीडियावर गायकाच्या निधनानंतर त्याचे चाहते हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्याच्या शेवटच्या कॉन्सर्टचे व्हिडीओ सर्वाधिक पाहिले जात आहेत. केकेच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. केकेच्या निधनावर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपासून अनेक टेलिव्हिजन कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

५३ वर्षीय केकेने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. काइट्स चित्रपटातील ‘जिंदगी दो पल की’, ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘आँखों में तेरी’, ‘बचना ए हसीनो’ चित्रपटातील ‘खुदा जाने’, ‘तडप तडप’ या चित्रपटातील गाण्यांनी त्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

टॅग्स :केके कृष्णकुमार कुन्नथ