Singer KK Unknown Facts: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके याचं काल रात्री कोलकातामध्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. तो कोलकातामधील एक कॉलेजमध्ये लाइव कॉन्सर्ट करत होता. कथितपणे त्याचवेळी त्याची तब्येत बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. केकेच्या निधनामुळे बॉलिवूड आणि त्याच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर लोक त्याच्याविषयी भरभरून लिहित आहेत आणि त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. आम्हीही त्याच्याविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत.
हॉटेलमध्ये नोकरी
केकेने सोनी म्युझिक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, म्युझिक इंडस्ट्रीत काम करण्यासाठी १९९४ मध्ये मुंबईत येण्याआधी तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. केकेने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीनुसार, त्याने एकदा हरिहरन यांना दिल्ली गाताना ऐकलं होतं. इथूनच दिग्गज गायकाने त्याला मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं.
३५०० पेक्षा जास्त जिंगल्स
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सिनेमात ब्रेक मिळण्याआधी केकेने ३५०० जिंगल्स गायले होते. इतकंच नाही तर त्याने १९९९ मध्ये भारतीय क्रिकेट टीमसाठी 'जोश ऑफ इंडिया' गाणंही गायलं होतं. त्यानंतर त्याने त्याचा पहिला अल्बम 'पल' रिलीज केला आणि तो लोकप्रिय झाला.
किशोर कुमार होते फेवरेट गायक
केकेने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याने कधीही गाण्याचं शिक्षण घेतलं नाही. तो म्युझिक स्कूलमध्ये गेला होता, पण काही दिवसांनी त्याने ते स्कूल सोडलं होतं. कारण प्रसिद्ध गायक किशोर कुमार केकेची प्रेरणा होते आणि किशोर कुमार यांनीही कधी म्युझिक स्कूलचा चेहरा पाहिलेला नव्हता. तरीही ते भारतातील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहेत.
‘तड़प तड़प’ मुळे मोठा ब्रेक
हिंदी सिनेमात केकेचं पहिलं गाणं 'माचिस' ‘छोड़ आए हम वो गलियां’ होतं. हे गाणं त्याच्यासोबतच हरिहरन, सुरेश वाडकर आणि विनोद सहगल यांनीही गायलं होतं. विशाल भारद्वाजने हे गाणं लिहिलं होतं. जे फारच गाजलं. पण त्याला मोठा ब्रेक सलमान खानचा सिनेमा ‘हम दिल दे चुके सनम’ मधून मिळाला. तडत तडप के हे गाणं त्याने गायलं आणि तो फेमस झाला.