Join us

गायक लकी अलीला ओळखणंही झालंय कठीण, 'ओ सनम' गाण्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By गीतांजली | Updated: November 13, 2020 19:24 IST

बॉलिवूड गायक लकी अलीच्या आवाजाचा प्रत्येकजण चाहता आहे.

बॉलिवूड गायक लकी अलीच्या आवाजाचा प्रत्येकजण चाहता आहे. त्याने बरीच हिट गाणी गायली आहेत. लकी अलीचा गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. 

लकी अलीचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, त्यात तो 'ओ सनम' गाणं गाताना दिसतो तसेच सोबत गिटार वाजवतो आहे. लकी अलीचा हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ एका लाईव्ह प्रोग्राम दरम्यानचा आहे. लकी अलीला या व्हिडीओवर यूजर्स तूफान कमेंट्स करत आहेत. 

 लकी अलीने गायक असण्यासोबत गीतकार आणि संगीतकार देखील आहे. गायक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात 'दुश्मन दुनिया का' या चित्रपटाच्या गाण्याने केली.हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. 'ना तुम जानो ना हम', 'आ भी जा', 'हैरात' आणि 'सफरनामा' अशी उत्कृष्ट गाणी गायली आहेत.

लकी अलीच्या नावाने प्रसिद्ध मकसूद महमूद अली हा बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता, गायक, निर्माता-दिग्दर्शक महमूद अली यांचा मुलगा आहे. लकी अलीची आई लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारीची बहीण आहे.

टॅग्स :लकी अली