'मोह मोह के धागे' फेम अभिनेत्री मोनाली ठाकुरच्या (Monali Thakur) दोन दिवसांपूर्वी झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तिच्यासोबत गैरवर्तवणूक करण्यात आली. ज्यामुळे गायिका भडकली आणि तिने जागीच कॉन्सर्ट थांबवली. गर्दीतील एका व्यक्तीने मधूनच उठून मोनालीच्या प्रायव्हेट पार्टबाबतीत आक्षेपार्ह कमेंट केली. यानंतर मोनालीला राग अनावर झाला. नक्की घडलं काय?
29 जून रोजी भोपाळमधील सेज युनिव्हर्सिटीमध्ये मोनाली ठाकूरच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टसाठी कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर चाहत्यांची मोठी संख्या होती. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, मोनालीने गाता गाता अचानक कॉन्सर्ट थांबवली. नंतर तिने टीम मेंबर्सला काय घडलं ते सांगितलं आणि ती भडकली. गर्दीतील एका व्यक्तीने मोनालीकडे इशारा करत तिच्या प्रायव्हेट पार्टवर आक्षेपार्ह कमेंट केली. ती म्हणाली, ' हा विनयभंग आहे. काही लोक गर्दीचा फायदा घेत लपून कमेंट करतात. याविरोधात मी आवाज उचलत आहे जेणेकरुन त्या व्यक्तीलाही ते लक्षात राहील.' नंतर मोनाली म्हणाली की तू किती तरुण आहेस अशा प्रकारे तू कोणावरच कमेंट करु शकत नाहीस. आज झालेल्या घटनेवर माझा तीव्र आक्षेप आहे.
यानंतर जेव्हा प्रकरण शांत झालं तेव्हा कॉन्सर्ट पुन्हा सुरु झाली. तर त्या व्यक्तीने नंतर स्पष्टीकरण देत सांगितले की त्याने केवळ मोनालीच्या डान्स मूव्ह्जवर कमेंट केली होती आणि काहीही आक्षेपार्ह बोलला नव्हता.
मोनाली ठाकूरने बॉलिवूडमध्ये अनेक हिंदी गाणी गायली आहेत जी सुपरहिट झाली आहेत. 'ये मोह मोह के धागे'साठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर 'सवार लूँ' गाण्यासाठी तिने फिल्मफेअर पटकावला.