Join us

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मोहीमेत सामील झाले शंकर महादेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 3:16 PM

या उपक्रमातून 'मान्सून मे बोल सून'चे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.त्यातून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या या मोहीमेत कांदिवली, ठाणे, मालाड आणि अन्य भागातील प्रश्न सोडविण्यात आले आहेत.

अवघ्या काही तासांच्या पावसानं मुंबईची होणारी तुंबई, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे होणारे हाल, यावर मलिष्कानं गाण्यातून भाष्य केले होते. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या वर्षी मलिष्कानं उपहासात्मक गाण्यातून बीएमसीवर निशाणा साधला होता. त्या गाण्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं मलिष्कावर जोरदार टीका केली होती. आता मलिष्का पाठोपाठ गायक शंकर महादेवनही पुढे सरसावले आहेत. त्यांनीही असाच कहीसा प्रयत्न केला आहे.

रेडिओ सिटीने 'कर मुंबईकर' या उपक्रमाअंतर्गत मुंबईकरांचे मान्सूनदरम्यान निर्माण होणारे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअंतर्गत, मुंबईकरांना पावसाळ्यात त्रासदायक ठरणारे प्रश्न मांडण्यास सांगण्यात आले.या आठवड्यात,रेडिओ सिटीच्या टीमने गायक शंकर महादेवन यांच्यासह नवी मुंबईतील वाशी येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मोहीमेत भाग घेतला.

 रेडिओ सिटीच्या आरजे सलील आणि आरजे रचना, दादाराव भिलोरे, इरफान मच्छीवाला, मुश्ताक अन्सारी वाशी टोल नाका येथील खड्डे बुजविताना उत्साही दिसत होते. भिलोरे यांनी आतापर्यंत ५७० खड्डे बुजविले आहेत. गायक शंकर महादेवन यांनी या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांचा उत्साह वाढविला. रेडिओ सिटीच्या 'कसं काय मुंबई' या लोकप्रिय शोमधून या उपक्रमाचे थेट घटनास्थळावरून प्रसारण करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत अनेक श्रोते या कामामध्ये सहकार्य करण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी रस्त्यावर येऊन खड्डे बुजविले.

या उपक्रमातून 'मान्सून मे बोल सून'चे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्यातून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या या मोहीमेत कांदिवली, ठाणे, मालाड आणि अन्य भागातील प्रश्न सोडविण्यात आले आहेत. या उपक्रमानंतर रेडिओ सिटी टीमचे आरजे सलील, आरजे अर्चना, गायक गजेंद्र वर्मा विक्रोळीतील 'खड्डा कन्सर्ट' आयोजित केले जाणार आहे. हा कार्यक्रम ११ ऑगस्ट रोजी होणार असून याठिकाणी गिटारच्या तालावर खड्ड्यावर उभे राहून गायन केले जाणार आहे.या कार्यक्रमाचा प्रतिसाद पाहता आता हा उपक्रम मुंबईच्या विविध भागात होणार आहे. मुंबईकरांनी त्यांच्या परिसरातील प्रश्न सोशल मिडीयावर मांडण्यासाठी 66969191 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रेडिओ सिटीने केले आहे.

टॅग्स :शंकर महादेवन