Join us

लिएंडर पेस पडला 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, लवकरच उडणार लग्नाचा बार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 10:28 AM

2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या 'क्यों, हो गया ना' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

जीवनातील प्रत्येक घडामोडींवर रसिकांचं बारीक लक्ष असते. विशेषतः त्यांचं अफेअर आणि लग्न याबाबत जाणून घेण्याची रसिकांना विशेष उत्सुकता असते. काजल अग्रवालचाही विशेष फॅन फॉलोअर्स आहेत. तसेच जेव्हापासून लिएंडर पेस  आणि काजल अग्रवाल यांच्या अफेअरच्या बातम्या येतात तेव्हापासून सोशल मीडियावर काजलला चाहते हाच प्रश्न विचारताना पाहायला मिळतायेत. 

मात्र यावर अजूनतरी काजलने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. गेल्याचवर्षी तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाचे काही खास प्लॅन सांगितले होते. तसेच लवकरच लग्न करणार असल्याचेही तिने त्यावेळी सांगितले होते. तसेच मीडिया रिपोर्टनुसार सध्या लिएंडर पेस आणि काजल दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुर्तास काजलकडून यावर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत चाहत्यांना तरी वाट पाहावी लागणार असेच दिसतंय.

काजल बॉलिवूडशिवाय साऊथ सिनेइंडस्ट्रीमध्ये  तिने तिचे स्थान निर्माण केले आहे. काजलने साऊथच्या अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.सध्या ती दोन साऊथच्या सिनेमात बिझी आहे. लवकरच ती ‘मुंबई सागा’ या सिनेमात झळकणार आहे. रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, प्रभास, ज्युनिअर एनटीआर, रामचरण अशा अनेकांसोबत ती दिसली आहे. काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या 'क्यों, हो गया ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये 'लक्ष्मी कल्याणम' या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या 'मगधीरा' सिनेमातून. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

टॅग्स :लिएंडर पेस