Join us  

'सिंघम अगेन'ची बंपर डील, अजय देवगणच्या सिनेमाने रिलीज आधीच कमावले २०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 7:56 PM

Singham Again Movie : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण(Ajay Devgan)च्या 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. दरम्यान, सिंघम अगेनशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे.

सिंघम अगेनची चर्चा रिलीज होण्याआधीच होत आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिंघम अगेनसाठी नॉन थिएट्रिकल करार करण्यात आला आहे. ज्याद्वारे चित्रपटाने रिलीजपूर्वी करोडो रुपयांची कमाई केली आहे.

रिलीजपूर्वी केली २०० कोटींची कमाईअजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे डिजिटल आणि म्युझिकचे राइट्स २०० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी एकत्रितपणे सॅटेलाइट, डिजिटल आणि संगीत हक्क विकले आहेत. निर्मितीशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, 'अजय देवगण आणि रोहित शेट्टीसाठी हा सर्वात मोठा करार आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे सॅटेलाइट प्लेयर्सकडून नेहमीच मोठी रक्कम मिळाली आहे. त्याच वेळी, डिजिटल प्लेयर्सने सिंघम अगेनला प्रीमियम किंमत देखील दिली आहे. 

'सिंघम अगेन'ने बजेटमधील ८० टक्के रक्कम केले वसूलसिंघम अगेनचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. निर्मात्यांनी २५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सिंघम अगेन तयार केला आहे. २०० कोटींचा नॉन-थिएटर डील मिळाल्यामुळे, रोहित आणि अजय देवगणच्या चित्रपटाने बजेटच्या ८० टक्के रक्कम वसूल केली आहे.

हे कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेतसिंघम अगेनमध्ये अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर करीना कपूर खान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, आशुतोष राणा, दयानंद शेट्टी आणि श्वेता तिवारी देखील या चित्रपटाचा भाग आहेत. अभिनेता अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :अजय देवगणरणवीर सिंगदीपिका पादुकोणरोहित शेट्टी